Join us
Daily Top 2Weekly Top 5

जुई गडकरीने केलंय बोटॉक्स? चाहतीच्या प्रश्नावर अभिनेत्रीने दिलं उत्तर; म्हणाली, "रोज त्वचेला..."

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 2, 2025 09:52 IST

'ठरलं तर मग' च्या सायलीने खरंच बोटॉक्स केलं?

अभिनेत्री जुई गडकरी (Jui Gadkari)  'ठरलं तर मग' मालिकेतून रोज प्रेक्षकांच्या भेटीला येते. सायली या भूमिकेतून तिने सर्वांचंच मन जिंकलं आहे. या मालिकेमुळे तिच्या चाहतावर्गात वाढ झाली आहे. जुईच्या साड्या, तिची स्टाईल सगळ्याचंच प्रेक्षक कौतुक करतात. आता नुकतंच तिला अनेकांनी त्वचेची कशी काळजी घेतेस यावर प्रश्न विचारलेत. तसंच एकीने तिला 'तू बोटॉक्स केलंस ना?' असंही थेट विचारलं. यावर जुईने चाहतीला काय उत्तर दिलं पाहा.

जुई गडकरीने इन्स्टाग्रामवर नुकतंच 'आस्क मी' सेशन घेतलं. यात तिला चाहत्यांनी मालिका आणि तिच्या वैयक्तिक आयुष्याबद्दल प्रश्न विचारले. यामध्ये एका चाहतीच्या प्रश्नाने लक्ष वेधलं. 'खरं खरं सांग तू बोटॉक्स केलंय का? कारण तुझ्यावर चेहऱ्यावर थोड्याही सुरकुत्या दिसत नाहीत'. असा प्रश्न जुईला विचारण्यात आला. यावर जुईने उत्तर देत लिहिले, "बोटॉक्स??? याचं खरं कारण सांगू का...रोज अगदी नियमितपणे सकाळी चेहऱ्याला बर्फ लावतेच. रोज सकाळी चेहऱ्यावरुन निदान २ मिनिटं तरी बर्फ फिरवायचा. त्याने त्वचा ताजीतवानी होते. त्वचेची लवचिकता वाढते. रक्तपुरवठा सुरळीत होतो. मेकअप नीट सेट होतो. तुम्हीही एका करुन पाहा आणि नंतर माझे आभार माना. Say no to botox!"

यासोबतच जुईने वेटलॉसच्याही टिप्स दिल्या. पुढचं पाऊल मालिकेवेळी तिचं वजन खूप जास्त होतं. ते कसं कमी केलं? यावर जुई लिहिते, "मी आधी थायरॉईड लेव्हल तपासली. मग त्याप्रमाणे नियमित व्यायाम केला. हेवी कार्डिओ, स्पिनिंग, फ्लोर एक्सरसाईज, योगा, लाईट वेट ट्रेनिंग. शरीराला याच सगळ्याची गरज असते. याशिवाय बॅडमिंटन, पळणे, झुंबा हे फन वर्कआऊट आहे."

टॅग्स :जुई गडकरीटिव्ही कलाकारमराठी अभिनेतात्वचेची काळजीसोशल मीडिया