Join us

'मन उडू उडू'नंतर हृता दुर्गुळे झळणार 'या' चित्रपटात; पोस्ट शेअर करत दिली माहिती

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 8, 2022 16:28 IST

Hruta durgule: सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या हृताने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत तिच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट सांगितली आहे.

'फुलपाखरु','दुर्वा' आणि आता ' मन उडू उडू झालं' या मालिकेच्या माध्यमातून प्रेक्षकांच्या भेटीला आलेली अभिनेत्री म्हणजे हृता दुर्गुळे. पहिल्या मालिकेपासून हृताने कलाविश्वात तिचा दबदबा निर्माण केला आहे. हृताने तिच्या सौंदर्याच्या जोरावर आज मोठा चाहतावर्ग निर्माण केला आहे. त्यामुळे तिच्याविषयी प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. मन उडू उडू झालं ही तिची मालिका सध्या झी मराठीवर सुरु आहे. विशेष म्हणजे या मालिकेनंतर आता हृता एका चित्रपटात झळकणार आहे.

सोशल मीडियावर सक्रीय असलेल्या हृताने इन्स्टाग्रामवर या चित्रपटाचं पोस्टर शेअर करत तिच्या आगामी चित्रपटाची रिलीज डेट सांगितली आहे. हृताने या चित्रपटाची घोषणा केल्यापासून नेटकऱ्यांमध्ये आता तिच्या भूमिकेविषयी जाणून घेण्याची उत्सुकता निर्माण झाली आहे.हृता लवकरच अनन्या या आगामी चित्रपटात झळकणार आहे. या चित्रपटाच्या पोस्टरमध्ये हृता, अनन्याच्या रुपात दिसत असून तिच्यातील धाडसीपणा दिसत आहे. या चित्रपटात अनन्याच्या जिद्दीचा, धाडसीपणाचा प्रवास उलगडला जाणार आहे.

''आयुष्य खूप सुंदर आहे. ते मनमुराद जगावे. खूप उर्जा आणि सकारात्मकता देणारा हा चित्रपट आहे," असं हृता म्हणाली.

दरम्यान, हा चित्रपट १० जून रोजी प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. या चित्रपटाचं दिग्दर्शन आणि लेखन प्रताप कड यांनी केलं आहे. तर निर्मिती एव्हरेस्ट एंटरटेनमेंट, ड्रीमव्हीवर एंटरटेनमेंट आणि रवी जाधव फिल्म्स यांनी केली आहे. 

टॅग्स :ऋता दूर्गुळेसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन