Join us

नवऱ्याला बालीला जायचं होतं, प्रसिद्ध अभिनेत्रीने दाखवला कोकणचा स्वर्ग! म्हणाली...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 26, 2024 13:18 IST

बॉलिवूडबरोबरच मराठी सेलिब्रिटीही व्हॅकेशनसाठी अनेकदा महाराष्ट्राबाहेरचं ठिकाण निवडतात. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीलाही व्हॅकेशनसाठी बालीला जायचं होतं. पण, अभिनेत्री नवऱ्याला कोकणात घेऊन गेली.

अनेक सेलिब्रिटी हॉलिडे आणि हनिमुनसाठी अन्य ठिकाणी जाणं पसंत करतात. मालदीव्स, गोवा, अंदमान, बाली या ठिकाणी सेलिब्रिटी त्यांचं व्हॅकेशन प्लॅन करताना दिसतात. बॉलिवूडबरोबरच मराठी सेलिब्रिटीही व्हॅकेशनसाठी अनेकदा महाराष्ट्राबाहेरचं ठिकाण निवडतात. प्रसिद्ध अभिनेत्रीच्या पतीलाही व्हॅकेशनसाठी बालीला जायचं होतं. पण, अभिनेत्री नवऱ्याला कोकणात घेऊन गेली. ही अभिनेत्री म्हणजे गौतमी देशपांडे. 

गौतमीने डिसेंबर २०२३मध्ये स्वानंद तेंडुलकरशी विवाह करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. लग्नानंतर स्वानंदबरोबरचे अनेक व्हिडिओ गौतमी सोशल मीडियावर शेअर करताना दिसते. आतादेखील असाच एक व्हिडिओ तिने शेअर केला आहे. गौतमी पती स्वानंदसोबत कोकणात गेली आहे. कोकणातील सर्जेकोट सुवर्णकडा या निसर्गरम्य ठिकाणाला तिने भेट दिली आहे. या व्हिडिओत गौतमी आणि स्वानंद सूर्यास्तचा आनंद घेताना दिसत आहे. या व्हिडिओला गौतमीने "त्याला बालीला जायचं होतं...मी कोकणात घेऊन आले", असं कॅप्शन दिलं आहे. तिच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

बहीण मृण्मयीच्या पावलावर पाऊल ठेवत गौतमीने अभिनय क्षेत्रात पदार्पण केलं. 'माझा होशील ना' या मालिकेतून ती अभिनयात पाऊल ठेवलं. अभिनय क्षेत्रात येण्याआधी गौतमी नोकरी करत होती. नोकरी सोडून तिने अभिनयात करिअर करण्याचा निर्णय घेतला. 

टॅग्स :गौतमी देशपांडेटिव्ही कलाकार