Join us
Daily Top 2Weekly Top 5

लाडक्या लेकाचं बारसं! लग्नाच्या अडीच वर्षानंतर अभिनेत्री झाली आई! चिमुकल्याचं नाव काय ठेवलंय? व्हिडीओ शेअर करत केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 9, 2025 16:57 IST

लग्नाच्या अडीच वर्षानंतर अभिनेत्री झाली आई! असा पार पडला लेकाचा नामकरण सोहळा, नाव काय ठेवलं माहितीये?

Amruta Pawar: छोट्या पडद्यावरील 'तुझ्या माझ्या संसाराला आणि काय हवं', 'स्वराज्य जननी जिजामाता' यांसारख्या मालिकांमध्ये महत्त्वपूर्ण भूमिका साकारून अभिनेत्री अमृता पवारने प्रेक्षकांच्या मनाचा ठाव घेतला.अमृता सध्या अभिनय क्षेत्रापासून दूर आहे आणि मात्वृत्वाचा आनंद घेत आहे. अभिनेत्री अमृता पवार काही महिन्यांपूर्वीच आई झाली. २६ एप्रिल २०२५ रोजी तिच्या घरात नव्या सदस्याचं आगमन झालं. अमृताचा लाडका लेक आता ७ महिन्यांचा झाला. अशातच लेकाच्या जन्मानंतर सात महिन्यांनी अभिनेत्रीने त्याचं बारसं केलं आहे. नुकताच सोशल मीडियावर अमृताने लेकाच्या नामकरण सोहळ्याचा खास व्हिडीओ शेअर केला आहे.

नुकतचं थाटामाटात अभिनेत्री अमृता पवारच्या लेकाचं बारसं पार पडलं. सोशल मीडियावर याचा सुंदर व्हिडीओ पोस्ट करत तिने लेकाच्या नावाबद्दही खुलासा केला आहे. अमृताने तिच्या मुलाचं नाव निवान ठेवलं आहे.दरम्यान, अमृता आणि तिचा नवरा नीलने हा व्हिडीओ इन्स्टाग्रामवर पोस्ट करत त्याला कॅप्शन देत लिहिलंय, निवान - “Holy” | “Sacred” | “Pure” . अमृताच्या या व्हिडीओवर अनेक मराठी कलाविश्वातील अनेक सेलिब्रिटींनी कमेंट्स करत तिच्या लेकाला शुभआशीर्वाद दिले आहेत.

अमृताने आजवर अनेक मालिका नाटकांमध्ये काम केलं आहे. स्वराज्य जननी जिजामाता मालिकेतील तिच्या भूमिकेचं विशेष कौतुक झालं.अमृताने २०२२ साली नील पाटीलसोबत लग्नागा बांधली. लग्नाच्या अडीच वर्षांनी त्यांच्या आयुष्यात नवा सदस्य आला.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीसोशल मीडिया