Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video : अमेरिकेच्या रस्त्यावर मराठी अभिनेत्रीचा ‘व्हॉट झुमका’ डान्स, व्हिडिओ व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 13, 2023 12:06 IST

अमृता खानविलकर, अदिती द्रविड यांच्यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा व्हॉट झुमका गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे.

अनेक कलाकारांचे रील व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल होत असतात. आलिया भट्टच्या व्हॉट झुमका गाण्यावरही अनेक सेलिब्रिटींनीही रील बनवले. मराठी कलाकरांनाही या गाण्यावर डान्स करण्याचा मोह आवरता आला नाही. अमृता खानविलकर, अदिती द्रविड यांच्यानंतर आता आणखी एका मराठमोळ्या अभिनेत्रीचा 'व्हॉट झुमका' गाण्यावरील व्हिडिओ व्हायरल होत आहे. लोकप्रिय अभिनेत्री अमृता देशमुखने आलिया भट्टच्या या गाण्यावर ठुमके लावले आहेत.

अमृताने तिच्या इन्स्टाग्राम अकाऊंटवरुन एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओमध्ये ती अमेरिकेच्या रस्त्यावर व्हॉट झुमका गाण्यावर थिरकताना दिसत आहे. पँट आणि टी शर्ट अशा साध्या वेशातच अमृताने या गाण्यावर डान्स केलेला व्हिडिओत दिसत आहे. या व्हिडिओला तिने “झुमका नसलेल्या दोन अमृता’ असं कॅप्शन तिने व्हिडिओला दिलं आहे. तिचा हा व्हिडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाला असून त्यावर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत.

‘वेलकम ३’मधून उदय शेट्टी गायब! नाना पाटेकर स्पष्टच बोलले, म्हणाले, “त्यांना वाटतं आम्ही...”

अमृता सध्या चित्रपटाच्या शूटिंग निमित्ताने अमेरिकेत आहे. काही दिवसांपूर्वीच तिने प्रसाद जवादेवरील प्रेमाची कबुली दिली होती. प्रसाद आणि अमृताने साखरपुडाही उरकला आहे. लवकरच ते लग्नबंधनात अडकणार आहेत. अमृता आणि प्रसाद ‘बिग बॉस मराठी’च्या चौथ्या पर्वात सहभागी झाले होते. तिथेच त्यांच्यातील प्रेमाचं नातं बहरलं.

दरम्यान, अमृताने अनेक मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘फ्रेशर्स’, ‘मी तुझीच रे’ यांसारख्या मालिकांमध्ये काम केलं आहे. ‘स्वीटी सातारकर’ या चित्रपटात अमृताने मुख्य भूमिका साकारली होती. याबरोबर अमृता रेडिओ जॉकीदेखील आहे. पुण्याची टॉकरवडी अशी तिची ओळख आहे.

टॅग्स :अमृता देशमुखमराठी अभिनेताटिव्ही कलाकार