Aishwarya Narkar: अभिनेत्री ऐश्वर्या नारकर (Aishwarya Narkar) हे या मराठी मनोरंजनविश्वातील लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहेत. या सुखांनो या, श्रीमंताघरची सून तसंच सातव्या मुलीची सातवी मुलगी यांसारख्या गाजलेल्या मालिकांमधून त्यांनी काम केलं आहे. गेली अनेक वर्ष त्या कलाविश्वात सक्रिय आहेत. चित्रपट, मालिका आणि नाटक अशा तिन्ही माध्यमांमध्ये त्यांनी आपल्या अभिनयाचा ठसा उमटवला आहे. ऐश्वर्या एका चित्रपटात अक्षय कुमारसोबतही स्क्रिन शेअर केली होती. अलिकडेच दिलेल्या मुलाखतीतमध्ये त्यांना अक्षयसोबत काम करण्याता अनुभव शेअर केला आहे.
अभिनेत्री ऐश्वर्या नारकर यांचा यांनी 'लोकशाही फ्रेंडली' ला मुलाखत दिली. त्यादरम्यान त्यांनी या क्षेत्रात येण्याचा निर्णय कधी घेतला. तसेच इतर कलाकांसोबत काम करण्याचा अनुभव शेअर केला. त्यावेळी त्या म्हणाल्या, महेश टिळेकर यांनी आधार नावाचा चित्रपट दिग्दर्शित केला होता. तेव्हा आमचे जे निर्माते होते त्यांनी या चित्रपटाच माझ्या नवऱ्याची भूमिका केली होती. त्यांचा अक्षय कुमार मित्र होता. शिवाय महेश टिळेकर देखील अक्षयला ओळख होते."
पुढे ऐश्वर्या यांना अक्षयसोबत काम करण्याची संधी मिळणार, तेव्हा काय प्रतिक्रिया होती? असा प्रश्न विचारण्यात आला. याबद्दल बोलताना त्या म्हणाल्या, "मला छानच वाटलं होतं. पण, अशी एक मनात भीती किंवा अतिउत्सुक नव्हते. एकच सीन करायचा होता. पण, त्याच्यासोबत काम करुन छान वाटलं. "अशा भावना ऐश्वर्या नारकर यांनी व्यक्त केल्या."
महेश टिळेकर दिग्दर्शित आधार हा चित्रपट २००२ साली प्रदर्शित झाला होता. या चित्रपटात ऐश्वर्या नारकर यांच्यासह लक्ष्मीकांत बेर्ड, सुलभा आर्य, जयराम कुलकर्णी तसेच अंकुश चौधरी अशा कलाकारांची फौज होती. या चित्रपटात अक्षय कुमारने कॅमिओ केला होता.