Join us

Animal मध्ये उपेंद्रचा अभिनय बघून त्याची मुलंही खूश, म्हणाला, 'लेकाच्या रशियातील मैत्रिणीने...'

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 6, 2023 13:32 IST

अभिनेता उपेंद्र लिमयेने Animal मध्ये छोटी भूमिका साकारली आहे.

रणबीर कपूरच्या Animal सिनेमाने बॉक्सऑफिसवर धुमाकूळ घातलाय. वीकेंडच काय सोमवारचे शोही हाऊसफुल झाले आहेत. Animal ने पहिल्या चारच दिवसात अनेक सिनेमांचे रेकॉर्ड मोडले आहेत. सिनेमात रणबीर कपूर शिवाय अनिल कपूर, रश्मिका मंदाना, बॉबी देओलही आहेत. मात्र ज्यांनी सिनेमा पाहिला असेल ते आपला मराठमोळा अभिनेता उपेंद्र लिमयेला (Upendra Limaye)  बघून आश्चर्यचकित झाले असणार. उपेंद्र लिमयेनेही सिनेमात छोटी पण महत्वाची भूमिका साकारली आहे. सध्या उपेंद्रवर त्याचे कुटुंबातील सदस्यही जाम खूश आहेत.

अभिनेता उपेंद्र लिमयेने Animal मध्ये छोटी भूमिका साकारली आहे. मध्यंतरानंतर त्याचा छोटा रोल आहे ज्यामध्ये त्याने आपला मराठी बाणाही डायलॉगमधून दाखवला आहे. उपेंद्रचा अभिनय बघून त्याच्या कुटुंबातील सदस्यांनी काय प्रतिक्रिया दिली यावर तो इट्स मज्जाला दिलेल्या मुलाखतीत म्हणाला,'माझ्या घरचे तर फारच खूश झालेत. माझ्या मुलांना तर ते सेलिब्रिटी असल्यासारखंच वाटतंय. प्रत्येक जण त्यांना सांगतोय, अरे,तुमचे बाबा....काका...काका...माझ्या मुलाची रशियातली मैत्रीणही त्याला मेसेज करतेय. सगळेच खूश आहेत हे पाहून मलाही बरं वाटतंय.'

तो पुढे म्हणाला,'शेजारच्या लोकांनाही त्यांच्या ओळखीतले लोक मेसेज करत आहेत. अरे तुम्ही उपेंद्र लिमयेला ओळखता ना त्याला आमचा निरोप द्या. असं शेजारच्यांना मेसेज येत आहेत. इतक्या मोठ्या स्तरावर क्रेझ पोहोचली आहे. थिएटरमधून माझ्या सीनचा व्हिडिओ काढून लोक मला पाठवत. एवढा प्रतिसाद पाहून मलाही खूप भारी वाटतंय.'

उपेंद्र लिमयेने याआधीही हिंदी सिनेमांमध्ये भूमिका साकारल्या आहेत. मुळशी पॅटर्नचा हिंदी रिमेक 'अंतिम' मध्ये उपेंद्रने काम केले होते. आता Animal मधील त्याच्या छोट्याशा भूमिकेचंही प्रचंड कौतुक होतंय.

टॅग्स :उपेंद्र लिमये रणबीर कपूरसिनेमाबॉलिवूडमराठी अभिनेता