Join us

सासरे अन् जावईबापू जोरात! प्रियाच्या वडिलांसाठी उमेशची खास पोस्ट; म्हणाला, तुम्ही...

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 8, 2023 15:49 IST

Umesh kamat: उमेशचं त्याच्या सासऱ्यांसोबत छान मैत्रीचं नातं असून अलिकडेच त्याने सासरेबुवांसाठी एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्यांच्यातील उत्तम मैत्रीचं नातं दिसून येतंय.

मराठी कलाविश्वातील पॉवरफूल कपल म्हणजे उमेश कामत ( umesh kamat) आणि प्रिया बापट( priya bapat). एव्हरग्रीन जोडी म्हणूनही या दोघांकडे पाहिलं जातं. विशेष म्हणजे एकमेकांशी लग्नगाठ बांधलेल्या जोडीमध्ये नवरा-बायको कमी आणि मैत्रीचं नात जास्त आहे. त्यांच्या अनेक पोस्टमधून त्यांच्यातील हे सुंदर नातं दिसूनही येतं. विशेष म्हणजे उमेशचं केवळ प्रियासोबतच छान नातं नसून त्याच्या सासऱ्यांसोबतही आहे. अलिकडेच त्याने सासरेबुवांसाठी एक पोस्ट शेअर केली. ज्यात त्यांच्यातील उत्तम मैत्रीचं नातं दिसून येतंय.

अभिनेत्री प्रिया बापट हिच्या बाबांचा आज ८१ वा वाढदिवस त्यानिमित्ताने प्रियाने नुकतीच वडिलांसाठी खास पोस्ट लिहिली. तिची ही पोस्ट चर्चेत येत असतानाच उमेशनेदेखील आपल्या सासऱ्यांसाठी सुंदर पोस्ट लिहिली आहे.

"प्रिय बाबा, तुम्हाला ८१ वा वाढदिवसाच्या खूप शुभेच्छा. सासरे असूनही तुमच्या मुलीपेक्षा माझी बाजू जास्त घेता यावर प्रिया चिडत असली तरी मला खूप आनंद वाटतो. तुम्ही जावयासारखं नाही, वडिल- मुलांसारखं हक्काचं नातं आपल्यात तयार होऊ दिलंत. तुमचं मेहनती असणं, साधं राहंणं, सतत active राहण, काम करत राहण हे माझ्यासाठी कायम आदर्श असेल," अशी पोस्ट उमेशने शेअर करत त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

दरम्यान, उमेश आणि प्रियाच्या वडिलांचं एकमेकांशी छान नातं आहे. त्यामुळे बऱ्याचदा प्रियाचे वडील घरात वाद झाल्यावर तिच्याऐवजी उमेशची बाजू घेतात हे त्याच्या पोस्टवरुन लक्षात येतं. 

टॅग्स :उमेश कामतसेलिब्रिटीटेलिव्हिजननाटकप्रिया बापट