Join us
Daily Top 2Weekly Top 5

Video: 'हम तो ऐसे है भैया!' मुसळधार पावसात सुनील बर्वेने मारला वडापाववर ताव

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 7, 2022 17:25 IST

Sunil Barve: यावेळी सुनीलने भरपावसात मस्तपैकी वडापाव आणि मिरची भजी खातांनाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला त्याने भन्नाट कॅप्शन दिलं आहे.

पावसाळ्याचे चारही महिने प्रत्येक व्यक्तीला सुखावणारे असतात. वातावरणातील गारवा, सर्वत्र पसरलेली हिरवळ आणि नद्यानाल्यांचं तुडुंब भरुन वाहणं हे प्रत्येक व्यक्तीला मोहून टाकणारं असतं. त्यामुळे या काळात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत प्रत्येक जण छोटासा का होईन ना ब्रेक घेऊन कुठे तरी एखादी पिकनिक अरेंज करत असतात. यात सध्या अनेक सेलिब्रिटी त्यांच्या मान्सून पिकनिकचे किंवा सेटवरील पावसात भिजतानांचे भन्नाट व्हिडीओ, फोटो शेअर करत आहेत. यात अभिनेता सुनील बर्वे यालाही भर पावसात गरमागरम वडापाव खाण्याचा मोह आवरला नाही. त्याने सोशल मीडियावर एक व्हिडीओ पोस्ट केला आहे.

 मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आणि एकेकाळी चॉकलेट बॉय म्हणून ओळखला जाणार सुनील बर्वे (Sunil Barve) सोशल मीडियावरही कमालीचा सक्रीय आहे. सध्या सुनील सहकुटुंब सहपरिवार या मालिकेत मुख्य भूमिका साकारत आहे. त्यामुळे अनेकदा तो सेटवरील त्याचे काही फोटो शेअर करत असतो.

यावेळी सुनीलने भरपावसात मस्तपैकी वडापाव आणि मिरची भजी खातांनाचा एक व्हिडीओ पोस्ट केला आहे. विशेष म्हणजे या व्हिडीओला त्याने भन्नाट कॅप्शन दिलं आहे. "आज तो माहौल बन गया है! मिरची का झटका और पाव भजिया!हम तो ऐसेच है भैया!"

दरम्यान, सध्या सोशल मीडियावर सुनील बर्वेचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. विशेष म्हणजे त्याचा हा नवा अंदाज प्रेक्षकांना कमालीचा आवडला आहे. सुनील बर्वेप्रमाणेच अन्य काही सेलिब्रिटींनीही त्यांचे पावसाळ्यातील खास फोटो, व्हिडीओ शेअर केले आहेत. 

टॅग्स :सुनील बर्वेसेलिब्रिटीसिनेमाटेलिव्हिजन