Join us

आईच्या लग्नाचा निर्णय घेण्यामागे सिद्धार्थ चांदेकरचा काय होता विचार, म्हणाला...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 22, 2024 15:39 IST

सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या आईचे थाटामाटात दुसरे लग्न लावून दिले आहे.

सिद्धार्थ चांदेकर हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. मालिका आणि चित्रपटांत काम करुन सिद्धार्थने सिनेसृष्टीत त्याची वेगळी ओळख निर्माण केली. काही दिवसांपूर्वी सिद्धार्थ चांदेकर याने आपल्या आईचे थाटामाटात दुसरे लग्न लावून दिले होते. सिद्धार्थच्या कृत्याचे अनेकांनी प्रचंड कौतुक देखील केले होते. नुकत्याच दिलेल्या एका मुलाखतीत सिद्धार्थने आईच्या दुसऱ्या लग्नाबद्दल भाष्य केलं. 

सिद्धार्थ चांदेकरने लोकमत फिल्मीच्या नो फिल्टर शोमध्ये दिलेल्या मुलाखतीत कलाविश्वातील आणि त्यांच्या खाजगी आयुष्यातील अनेक गोष्टींवर मोकळेपणाने भाष्य केलं. यावेळी आईचं पुन्हा एकदा लावून देण्याचा निर्णय घेण्यामागे त्यांचा काय विचार होता, याचा खुलासा सिद्धार्थनं केला. तो म्हणाला, 'मला काही गोष्टींची जाणीव झाली होती की, मी मुलगा आहे तिचा सांभाळ कायम करेल. पण जो संवाद तिला हवा आहे, तो माझ्याकडून मिळणार नाही. पन्नाशीनंतर एका बाईला रोजचा संवाद हा तिच्या जोडीदारासोबत हवा असतो'.

पुढे तो म्हणाला, 'आपण पार्टनर या गोष्टीला महत्त्व देत नाही. आपले आई-वडील जर एकटे असतील अर्थात सिंगल पेरेंट असतील तर त्यांना कोणत्याच जोडीदाराची गरज नाही, त्यांच्यासाठी आपण आहोत की असं आपल्याला वाटतं आणि हे आपणचं ठरवलेलं असतं. माझ्याशी बोलून-बोलून ती किती बोलले. ती मला चार गोष्टी माझ्या विचारेल. तर काही मी तिला विचारेल. पण तो संवाद होणार नाही, जो तिला हवा आहे', या शब्दात सिद्धार्थनं त्यांच्या भावना व्यक्त केल्या. 

वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर,  सिद्धार्थ चांदेकरचा  'श्रीदेवी प्रसन्न' चित्रपट रीलिज झाला होता. यात  तो सई ताम्हणकरसोबत झळकला होता. या सिनेमातून एक आगळीवेगळी लव्ह स्टोरी प्रेक्षकांना पाहायला मिळाली. तर याआधी तो 'झिम्मा-2' मधून प्रेक्षकांच्या भेटीला आला होता.  या चित्रपटानं बॉक्स ऑफिसवर धुमाकूळ घातला. सिद्धार्थने अनेक मालिका आणि चित्रपटांत काम केलं आहे. 'झेंडा' या अवधूत गुप्तेच्या चित्रपटांतून त्याला पहिला ब्रेक मिळाला होता.  

टॅग्स :सिद्धार्थ चांदेकरसेलिब्रिटीमराठी अभिनेतामराठी चित्रपटलग्न