Join us
Daily Top 2Weekly Top 5

सचिन खेडेकर यांच्या लग्नाला ३० वर्षं पूर्ण, पत्नीसोबतच्या 'त्या' खास फोटोने वेधलं लक्ष

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 19, 2023 08:36 IST

सचिन खेडेकर यांच्या पत्नी कोण आहेत माहितीये का?

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेते सचिन खेडेकर (Sachin Khedekar) यांच्या लग्नाला ३० वर्ष पूर्ण झाली आहेत. यानिमित्ताने त्यांनी शेअर केलेल्या पत्नी जल्पा खेडेकर यांच्यासोबतच्या फोटोने सगळ्यांचं लक्ष वेधून घेतलंय. दोघंही एका रेस्टॉरंटमध्ये असून त्यांच्या तोंडात सिग्रेट आहे. दोघांनी तोंडातील सिग्रेट एकमेकांच्या सिग्रेटला लावली आहे. त्यांच्या या फोटोवर अनेकांनी कमेंट करत त्यांना लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

अभिनेते सचिन खेडेकर यांच्या पत्नी जल्पा खेडेकर या प्रसिद्धीझोतापासून कायमच दूर राहिल्या आहेत. त्यांनी वेगळ्या क्षेत्रात ओळख मिळवली आहे.जल्पा एक स्वतंत्र व्यावसायिक आहेत. प्रोव्हो सेंटरमध्ये त्या व्यावसायिक थेरपिस्ट सहाय्यक पदावर काम करत असल्याचं सांगण्यात येतं. पत्नीला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा देताना सचिन खेडेकर लिहितात,'जल्पा, माझ्या जीवनाचा प्रकाश. तुला ३० व्या लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा. तुम्हाला एखादी व्यक्ती तिच्या सर्व गुणांमुळे आवडते आणि काही गुणांमुळे तुमचं त्या व्यक्तीवर प्रेम असतं. हीच परफेक्ट रेसिपी आहे.'

त्यांच्या या पोस्टवर कलाविश्वातून आणि चाहत्यांकडून शुभेच्छांचा वर्षाव होत आहे. सचिन खेडेकर यांनी 19 डिसेंबर 1993 साली लग्नगाठ बांधली. त्यांनी अनेक मालिका, नाटक, सिनेमांमध्ये काम केलं. 'मी शिवाजीराजे भोसले बोलतोय' या सिनेमाने तर त्यांना प्रचंड लोकप्रियता दिली. ते मराठीशिवाय बॉलिवूड आणि टॉलिवूडमध्येही अॅक्टिव्ह असतात. अनेक साऊथ सिनेमांतही त्यांनी भूमिका साकारल्या आहेत. अभिनयासोबतच ते दिग्दर्शकही आहेत. 

टॅग्स :सचिन खेडेकरमराठी अभिनेतालग्नव्हायरल फोटोज्सोशल मीडिया