Join us

jhukenge nahin Sala! प्रशांत दामले यांनीही फॉलो केला 'पुष्पा' ट्रेंड; पाहा त्यांचा मजेशीर व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 15, 2022 17:56 IST

Prashant damle: प्रशांत दामले यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते पुष्पाचा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत.

दाक्षिणात्य सुपरस्टार अल्लू अर्जुन (allu arjun) आणि रश्मिका मंदाना (rashmika mandana) यांचा 'पुष्पा' (pushpa) हा चित्रपट काही महिन्यांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला. हा चित्रपट प्रदर्शित होऊन साधारणपणे दोन एक महिने झाले असतील. मात्र, तरीदेखील या चित्रपटाची क्रेझ आणि लोकांवर असलेला पुष्पा फिवर काही केल्या कमी व्हायचं नाव नाही. या चित्रपटातील झुकूंगा नहीं ही पुष्पाची स्टाइल सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी ट्राय केली. विशेष म्हणजे हा ट्रेंड फॉलो करण्याचा मोह अभिनेता प्रशांत दामले यांनाही आवरला नाही.

प्रशांत दामले यांनी त्यांच्या इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये ते पुष्पाचा ट्रेंड फॉलो करताना दिसत आहेत. मात्र, यावेळी त्यांनी एका वेगळ्या अंदाजात मजेशीरपणे हा ट्रेंड फॉलो केला आहे. त्यामुळे नेटकऱ्यांकडून या व्हिडीओला मोठी पसंती मिळत आहे.

दरम्यान, कलाविश्वाप्रमाणेत प्रशांत दामले सोशल मीडियावरही सक्रीय असतात. यात अनेकदा ते त्यांच्या आगामी नाटकांविषयीचे अपडेट्स शेअर करत असतात. अलिकडेच त्यांनी 'सारखं काहीतरी होतंय'  या आगामी नाटकाविषयीची माहिती दिली आहे. या नाटकाच्या निमित्ताने ते तब्बल ३६ वर्षानंतर अभिनेत्री वर्षा उसगांवकर यांच्यासोबत रंगमंचावर झळकणार आहेत.

टॅग्स :प्रशांत दामलेसेलिब्रिटीसिनेमापुष्पाअल्लू अर्जुन