Join us

'.. आणि अख्ख घर दाटून आल्यासारख झालंय'; कुशल बद्रिकेची खास व्यक्तींसाठी पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 12, 2022 16:45 IST

Kushal badrike: सामान्यांप्रमाणे अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पहिल्या पावसाचा अनुभव शेअर केला आहे. यात कुशलनेही एक पोस्ट शेअर केली आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता म्हणजे कुशल बद्रिके. आपल्या विनोदीशैलीमुळे प्रेक्षकांचं मन जिंकणारा कुशल त्याच्या सोशल मीडिया पोस्टमुळेही चर्चेत असतो. कलाविश्वाप्रमाणे कुशल सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टीव्ह असून  वरचेवर नवनवीन पोस्ट शेअर करत नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत असतो. सध्या कुशलची अशीच एक पोस्ट चर्चेत आली आहे. 

जून महिना सुरु झाल्यामुळे मुंबईत आता हळूहळू पावसाला सुरुवात झाली आहे. त्यामुळे सामान्यांप्रमाणे अनेक सेलिब्रिटींनी त्यांच्या पहिल्या पावसाचा अनुभव शेअर केला आहे. यात कुशलने त्याच्या मुलांचा एक गोड फोटो शेअर केला आहे. विशेष म्हणजे या फोटोला त्याने दिलेलं कॅप्शन नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे.

"माझी दोन्ही आभाळं गॅलरीमधून पाऊस पहातायत,आणि अख्ख घर दाटून आल्यासारख झालंय,'' असं कॅप्शन कुशलने या फोटोला दिलं आहे. या फोटोमध्ये त्याच्या घरातून दाटून आलेले ढग दिसत आहेत. तसंच या ढगांकडे त्याची दोन मुलं मोठं कुतूहलाने पाहताना दिसत आहेत.

दरम्यान, कुशलने या फोटोला दिलेलं कॅप्शन सध्या नेटकऱ्यांचं लक्ष वेधून घेत आहे. कुशल सोशल मीडियावर कमालीचा सक्रीय असून तो कायम काही ना काही पोस्ट शेअर करत चाहत्यांच्या संपर्कात राहत असतो. कुशलने अनेक रिअॅलिटी शोसोबतत काही गाजलेल्या चित्रपटांमध्येही काम केलं आहे. यात अलिकडेच त्याचा पांडू हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला.

टॅग्स :कुशल बद्रिकेसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा