Join us

'काय झाडी, काय डोंगार' म्हणत भैय्यासाहेबांचं इन्स़्टाग्रामवर कमबॅक; पाहा व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 4, 2022 19:50 IST

Kiran gaikwad: मध्यंतरी किरणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत काही काळ सोशल मीडियापासून लांब जात असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता काय झाडी, काय डोंगार म्हणत त्याने दमदार कमबॅक केलं आहे.

सध्या सोशल मीडियावर काय झाडी, काय डोंगार असं म्हणत हटके मजेदार व्हिडीओ करण्याचा नवा ट्रेंड सुरु झाला आहे. यात सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी त्यांचे व्हिडीओ, फोटो पोस्ट करत हे कॅप्शन दिलं आहे. अगदी सई ताम्हणकर, किशोर कदम, कुशल बद्रिके या कलाकारांनीही पोस्ट शेअर केल्या. विशेष म्हणजे आता यामध्ये अभिनेता किरण गायकवाडलाही मोह आवरला नाही.

मध्यंतरी किरणने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर करत काही काळ सोशल मीडियापासून लांब जात असल्याचं म्हटलं होतं. मात्र, आता 'काय झाडी, काय डोंगार',  म्हणत त्याने दमदार कमबॅक केलं आहे. किरणने त्याच्या इन्स्टाग्रामवर अनेक पोस्ट शेअर केल्या आहेत. मात्र, काय झाडीच्या पोस्टवर नेटकऱ्यांनी तुफान कमेंटचा पाऊस पाडला आहे.

दरम्यान, किरण गायकवाड हा मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता आहे. लागीरं झालं जी मालिकेत भैय्यासाहेब ही भूमिका साकारुन तो घराघरात पोहोचला. परंतु, देवमाणूस या मालिकेमुळे त्याला खऱ्या अर्थाने लोकप्रियता मिळाली. आज किरण छोट्या पडद्यावरील लोकप्रिय अभिनेता म्हणून ओळखला जातो. 

टॅग्स :किरण गायकवाडसेलिब्रिटीटेलिव्हिजनटिव्ही कलाकार