Join us
Daily Top 2Weekly Top 5

अंशुमन विचारेने जपलीयेत गावची नाती; शेअर केला कोकणातील घराचा खास व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 5, 2023 16:13 IST

Anshuman Vichare: अंशुमन विचारेचं एकत्र कुटुंब पाहिलंय का?

प्रत्येक व्यक्तीला आपल्या गावाविषयी विशेष प्रेम असतं. त्यामुळे तो कामानिमित्त कुठेही राहत असला तरीदेखील त्याला गावी जायची ओढ कायम असते. यात उन्हाळ्याच्या सुट्टीत आणि शिमग्याला तर कोकणी माणूस हमखास त्याच्या गावी जातो. यामध्येच अभिनेता अंशुमन विचारे यानेदेखील त्याचं गाव गाठलं आहे. अंशुमनने सोशल मीडियावर त्याच्या गावच्या घराचा आणि कुटुंबाचा एक व्हिडीओ शेअर केला आहे.

मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेता अंशुमन विचारे सोशल मीडियावर कमालीचा अॅक्टीव्ह आहे हे साऱ्यांनाच ठावूक आहे. त्यामुळे कायम तो त्याच्या जीवनातील लहानसहान गोष्टी चाहत्यांसोबत शेअर करत असतो. यावेळी त्याने त्याच्या गावच्या घराचा एक व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये त्याचं संपूर्ण कुटुंब एकत्र दिसत असून ते गावची परंपरा कशा पद्धतीने पार पाडतात हे दाखवलं आहे.

'माझं गाव तूरळ आणि गावची राखण धम्माल.....' असं कॅप्शन देत अंशुमनने हा व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये एकीकडे त्याच्या घरातल्या स्त्रिया जेवत असून पुरुष मंडळी त्यांना आग्रहाने जेवायला वाढत आहेत. तर, दुसरीकडे घरातील लहान-मोठे सारेच जण मस्ती पाऊस एन्जॉय करुन नाचत आहेत. या व्हिडीओवरुन अंशुमनचा परिवार प्रचंड मोठा असल्याचं लक्षात येतं. त्याच साधारणपणे २५-३० जणांचं कुटुंब असेल असा यावरुन अंदाज लावता येतो. 

टॅग्स :अंशुमन विचारेसेलिब्रिटीटेलिव्हिजनसिनेमा