Join us
Daily Top 2Weekly Top 5

पूजा सावंतची लगीनघाई...'या' ठिकाणी बांधणार लग्नगाठ, स्वत:च केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 22, 2024 08:52 IST

अभिनेत्री पूजा सावंत प्रोफेशनल लाइफसोबत खासगी आयुष्यामुळे चर्चेत येत असते.

मराठी सिनेइंडस्ट्रीतील प्रसिद्ध अभिनेत्री पूजा सावंत (Pooja Sawant) गेल्या काही दिवसांपासून सातत्याने चर्चेत येत आहे. काही महिन्यांपूर्वी पूजा सावंत हिनं होणाऱ्या नवऱ्यासोबतचा एक खास फोटो शेअर करत चाहत्यांना सुखद धक्का दिला. लाइफ पार्टनर म्हणून सिद्धेश चव्हाण याची तिनं केली आहे. तेव्हापासून ती चर्चेत आहे. लवकरच पुजा आणि सिद्धेश ही जोडी  लग्नगाठ बांधणार आहे. आता एका मुलाखतीत तिनं लग्नाच्या ठिकाणाबद्दल खुलासा केला आहे. 

पूजा सावंतने नुकतंच 'लोकसत्ता डिजीटल अड्डा'ला मुलाखत दिली. यावेळी तिला डेस्टिनेशन वेडिंग करणार का असा प्रश्न केला. यावर ती म्हणाली,  'मला डेस्टिनेशन नाही करायचं आहे. मी मुंबईत लग्न करणार आहे. डेस्टिनेशन वेडिंग सुंदर आहे. कुठेतरी दूर एक लोकशन असतं आणि सगळी माणसं तिकडे पोहचतात. मी शूटिंगसाठीच खूप प्रवास करते. त्यामुळे लग्नाच्या दिवशी मला प्रवास नाही करायचं. मला माझ्या घरात सकाळी उठायचं आहे आणि आईच्या हातचा नाष्टा करायचा आहे'.

पुढे ती म्हणाली, सध्या डेस्टिनेशन वेडिंगचं प्रचंड फॅड आहे. पण मला असं वाटतं की ते फक्त दिखाव्यासाठी करतात.  मला लग्न आणि विधींचा गोडवा जपायचा आहे. सिद्धेश खूप साधा आहे आणि अशाच साध्या गोष्टी आवडतात. त्यामुळे आम्ही जे काही ठरवू ते मोठं असं काही नसेल. आम्ही खूप साध्या पद्धतीने आणि कुटुंबाच्या उपस्थित लग्न करु'.

लग्न कधी करणार या प्रश्नावर ती म्हणाली, 'खरं तरं तुम्ही हा प्रश्न सिद्धेशलाही विचारला पाहिजे. काण त्याच्या सुट्ट्यांसाठी मी थांबली आहे. आम्हाला 2024 मध्येच लग्न करायचं आहे. सुट्टी मिळाली की सिद्धेश फेब्रुवारी- मार्चमध्ये भारतात येणार आहे. तर आम्ही 'चट मंगनी पट ब्याह' अशा पद्धतीने लग्न करु. कारण 2025 या पूर्ण वर्षात मला अजिबात वेळ नाही'. शिवाय, लग्नानंतर ऑस्ट्रेलियात स्थायिक होणार नसल्याचंही तिनं सांगितलं.

टॅग्स :पूजा सावंतसेलिब्रिटीलग्नमुंबईमराठी अभिनेतामराठी चित्रपट