Join us

देशपांडे सरांसमोर इंद्रा देणार दिपूवर असलेल्या प्रेमाची कबुली; मालिकेत येणार मोठा ट्विस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 19, 2022 17:47 IST

Mann udu udu zal: अलिकडेच या मालिकेत इंद्रा आणि दिपू यांच्यातील प्रेम खुलत असल्याचं पाहायला मिळालं. परंतु,या प्रेमामध्ये देशपांडे सरांनी मीठाचा खडा टाकला आहे.

अल्पावधीत लोकप्रिय झालेली मालिका म्हणजे 'मन उडू उडू झालं'. या मालिकेतील कलाकारांनी उत्तम अभिनयशैलीच्या जोरावर प्रेक्षकांची मनं जिंकून घेतली आहेत. त्यामुळे या मालिकेतील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी चाहते उत्सुक असतात. अलिकडेच या मालिकेत इंद्रा आणि दिपू यांच्यातील प्रेम खुलत असल्याचं पाहायला मिळालं. परंतु,या प्रेमामध्ये देशपांडे सरांनी मीठाचा खडा टाकला आहे. त्यांनी इंद्राजवळ सानिकासोबत लग्न करण्याचा प्रस्ताव ठेवला आहे. त्यामुळे मालिकेत रंजकदार वळण आलं आहे. परंतु, इंद्रा आता देशपांडे सरांसमोर त्याचं खरं प्रेम दिपूवर असल्याचं सांगणार आहे.

झी मराठीने त्यांच्या अधिकृत इन्स्टाग्राम पेजवर एक प्रोमो शेअर केला आहे. या प्रोमोमध्ये इंद्रा, देशपांडे सरांसमोर त्याच्या प्रेमाची कबुली देत आहे. परंतु, हे सांगत असताना तो थेट न जाता फिरवून फिरवून त्यांना सांगायचा प्रयत्न करत आहे. अखेर त्याचं कोडं न उलगडू शकल्यामुळे देशपांडे सर त्याला त्या मुलीचं नाव विचारतात.यावर आता इंद्रा दिपूचं नाव घेण्याची शक्यता आहे.

दरम्यान, सानिकाचं कार्तिकवर प्रेम असतं. परंतु, कार्तिक योग्य मुलगा नसल्याचं म्हणत देशपांडे सर या लग्नाला नकार देतात. तसंच सानिकाचं चांगलं व्हायचं असेल तर इंद्रा तिच्यासाठी योग्य मुलगा असल्याचं ते म्हणतात. व, इंद्राने सानिकासोबत लग्न करावं अशी विनंती त्याला करतात. परंतु, इंद्राचं देशपांडे सरांच्या धाकट्या मुलीवर दिपूवर प्रेम असतं. त्यामुळे आता इंद्रा देशपांडे सरांना दिपूवरच्या प्रेमाविषयी सांगणार की नाईलाजाने सानिकासोबत लग्न करणार हे येत्या भागातच प्रेक्षकांना कळणार आहे. 

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारअरुण नलावडेऋता दूर्गुळे