Join us
Daily Top 2Weekly Top 5

'मन उडू उडू झालं' फेम अजिक्य राऊतनं खरेदी केली गाडी, नव्याकोऱ्या कारचा व्हिडीओ पाहिलात का?

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 18, 2024 13:49 IST

अजिक्यनं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

'विठू माऊली' मालिकेतून घराघरात पोहोचलेला विठ्ठल आणि 'मन उडू उडू झालं' या मालिकेतून इंद्रा म्हणून लाखो तरुणींची क्रश झालेला अभिनेता अजिंक्य राऊत सध्या बराच चर्चेत आहे. त्याची लोकप्रियता देखील दिवसागणिक वाढत आहे. तरुणांमध्ये खास करून तरुणींमध्ये तो खूपच लोकप्रिय झाला आहे. अशातच अजिक्यनं चाहत्यांसोबत आनंदाची बातमी शेअर केली आहे.

अजिंक्यनं आपल्या अभिनयाच्या जोरावर अजिंक्यने मराठी मनोरंजनसृष्टीत वेगळे स्थान निर्माण केले आहे. सोशल मीडियावर तो नेहमी सक्रिय असतो. निरनिराळे फोटो व व्हिडीओ शेअर करत तो चाहत्यांना अपडेट देत असतो.  अजिंक्यने नुकतीच एक नवी कोरी कार खरेदी केली आहे. याचा एक व्हिडीओ त्यानं सोशल मीडियावर शेअर केला आहे. या व्हिडीओमध्ये अजिंक्यच्या नवीन कारची झलक पाहायला मिळत आहे.

कॅप्शनमध्ये त्याने लिहलं, 'आनंदी, सोपे आणि समाधानी जीवन. तुमची सगळी स्वप्ने प्रत्यक्षात खरी होवोत आणि ही स्वप्ने पूर्ण होण्याचा आनंद  ज्यांनी तुमची प्रगती होत असताना तुम्हाला पाहिलं त्याच्या डोळ्यात दिसूदेत. यासाठी मी कृतज्ञ व धन्य असून मला याक्षणी माझ्या कुटुंबाची खूप आठवण येत आहे. पण मला माहित आहे की ते तिथे खूप आनंदी आहेत आणि त्यांना माझा अभिमान आहे. तसेच या क्षणासाथी मला माझे गुरू सद्गुरु वेणा भारती महाराज यांचे आशीर्वाद मिळू शकले याचाही मला आनंद आहे'. जवळच्या मित्र-मैत्रिणींसह अनेक सेलिब्रिटींनी आणि चाहत्यांनी त्याच्या पोस्टवर शुभेच्छांचा वर्षाव केला आहे. 

अजिंक्यने मालिकांबरोबरच चित्रपटांतही काम केलं आहे. अजिंक्यने 'टकाटक २', 'सरी' असे दर्जेदार चित्रपट करून प्रेक्षकांना भुरळ घातली. सध्या तो नव्या भूमिकेतून भेटीला येत असतो. 'अबोल प्रीतीची अजब कहाणी' या मालिकेत अजिंक्य राजवीर ही भूमिका साकारताना दिसत आहे. या मालिकेत सतत नवनवी वळणे येत असतात. तसेच लवकरच त्याचा ‘कन्नी’ या चित्रपट प्रदर्शित होणार असल्याने चाहत्यांना या चित्रपटाची उत्सुकता लागून राहिली आहे.

टॅग्स :मराठी अभिनेतामराठी चित्रपटसेलिब्रिटीकारसोशल मीडिया