Join us
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या 16 वर्षानंतर टीव्हीवरील प्रसिद्ध कपल मानिनी-मिहीर झाले विभक्त, 6 महिन्यापासून राहतायेत वेगळे

By ऑनलाइन लोकमत | Updated: July 8, 2020 18:24 IST

दोघांची ओळख एका कॉमेन फ्रेंडच्या पार्टीत झाली होती

टीव्ही इंडस्ट्रीतमधून रोज  काही ना काही तरी वाईट बातमी ऐकायले येते आहे. टीव्ही जगतात अशी अनेक कप्लस आहेत ज्यांनी येथून प्रवास सुरू केला परंतु तो प्रवास पूर्ण करू शकला नाही. काही दिवसांपूर्वी अमीर अली आणि संजीदा शेख विभक्त झाल्याचे कळले होते. आता मानिनी डे आणि मिहीर मिश्रा यांच्या नात्यात दुरावा आला आहे. 16 वर्षांपूर्वी मानिनी आणि मिहीर लग्नाच्या बेडीत अडकले होते. एबीपी न्यूजच्या रिपोर्टनुसार, गेल्या 6 महिन्यांपासून दोघे वेगळे-वेगळे राहतायेत.  मानिनी आपल्या मुलीसोबत मुंबईत राहतेय तर मिहीर आपल्या आई-वडिलांसोबत पुण्यात रहातो आहे. 

मीडिया रिपोर्टनुसार मानिनी डे म्हणाली, 'लग्न हे प्रत्येक नात्यासारखेच असते ... चढ-उतारही येत असतात.' हे खरं आहे की गेल्या 6 महिन्यांपासून मी आणि मिहिर वेगळे-वेगळे राहतो आहे.

आमच्या विभक्त होण्यामागे एक  वैयक्तिक कारण आहे ज्याबद्दल मी बोलू शकत नाही. मी आमच्या नात्यातील पवित्रतेचा आदर करते. आम्ही या नात्यात सर्व काही दिले आहे परंतु त्याचा परिणाम आमच्या हातात नाही. मानिनी आणि मिहीरची ओळख एका कॉमेन फ्रेंडच्या पार्टीत झाली होती. यानंतर दोघे एकमेकांना ओळखू लागले आणि 2004मध्ये लग्नाच्या बेडीत अडकले. 

टॅग्स :टिव्ही कलाकारघटस्फोट