Join us

लग्न होऊन परदेशात गेलेल्या मराठी अभिनेत्रीचं ऑस्ट्रेलियात होळी सेलिब्रेशन, धुळवडीचा फोटो समोर

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 23, 2024 15:53 IST

Holi 2024 : प्रसिद्ध मराठी अभिनेत्रीने ऑस्ट्रेलियात साजरी केली होळी, लग्न होऊन परदेशात झालेली स्थायिक

दरवर्षी देशात सर्वत्र होळीचा सण मोठ्या उत्साहात साजरा केला जातो. होळीनंतर धुळवड आणि रंगपंचमीला रंगाची उधळण केली जाते. सेलिब्रिटीही दरवर्षी होळी खेळण्याचा मनसोक्त आनंद घेतात. बॉलिवूड सेलिब्रिटींकडून होळीनिमित्त पार्टीचंही आयोजन केलं जातं. अशाच एका मराठमोळ्या अभिनेत्रीने परदेशात होळी साजरी केली आहे. याचा व्हिडिओ तिने शेअर केला आहे. 

'मन उधाण वाऱ्याचे' मालिकेतून घराघरात पोहोचलेली अभिनेत्री म्हणजे नेहा गद्रे. अभिनयाबरोबरच नेहाच्या सौंदर्याने चाहत्यांना भुरळ घातली होती. या मालिकेने नेहाला लोकप्रियतेच्या शिखरावर नेऊन ठेवलं होतं. पण, लग्नानंतर नेहाने अभिनयाला रामराम केला आणि पतीसोबत ती ऑस्ट्रेलियाला स्थायिक झाली. अभिनयापासून दूर असलेली नेहा सोशल मीडियावरून चाहत्यांच्या संपर्कात राहण्याचा प्रयत्न करते. वैयक्तिक जीवनातील अपडेट ती चाहत्यांना देत असते. परदेशात स्थायिक झालेली असली तरी नेहा दिवाळी, होळी असे सगळे सण साजरे करताना दिसते. आतादेखील तिने ऑस्ट्रेलियात होळी साजरी केली. 

ऑस्ट्रेलियातील ब्रिसबेन शहरात आयोजित केलेल्या होळी पार्टीत नेहाने पतीसोबत हजेरी लावली होती. या पार्टीत नेहा आणि तिचा पती बॉलिवूड गाण्यांवर थिरकताना दिसत आहे. नेहाने रंगांची उधळण केल्याचंही व्हिडिओत पाहायला मिळत आहे. नेहाच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंटही केल्या आहेत. 

नेहाने २ मार्च २०१९ मध्ये ईशान बापटशी लग्न करत नवीन आयुष्याला सुरुवात केली. तिने ‘मन उधाण वाऱ्याचे’, ‘अजूनही चांद रात आहे’ या मालिकांमध्ये काम केलं आहे. तर 'मोकळा श्वास', 'गडबड झाली' या सिनेमांतही ती झळकली होती. सध्या नेहा अभिनयापासून दूर असून ऑस्ट्रेलियात शिक्षिका आहे. 

टॅग्स :टिव्ही कलाकारहोळी 2024