Join us
Daily Top 2Weekly Top 5

अर्जुन कपूर नाही तर 'ही' व्यक्ती आहे मलायका अरोराची सपोर्ट सिस्टम!

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 31, 2023 19:14 IST

मलायकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे.

 अभिनेत्री मलायका अरोरा गेल्या काही दिवसांपासून तिच्या खासगी आयुष्यामुळे चर्चेत आली आहे. मलायकाच्या आयुष्यात काय सुरू आहे हे जाणून घेण्यासाठी तिचे चाहते खूप उत्सुक असतात. नुकतेच मलायकाने एक पोस्ट शेअर केली असून तिचं सपोर्ट सिस्टम कोण आहे, हे सांगितलं. मलायकाने इन्स्टाग्रामवर एक पोस्ट शेअर केली आहे. या पोस्टने सर्वांचे लक्ष वेधलं आहे.

 मलायका अरोराने तिच्या इंस्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे. ज्यामध्ये ती मुलगा अरहान खानसोबत पोज देताना दिसत आहे. या फोटोमध्ये दोघेही ख्रिसमस लूकमध्ये दिसत आहेत. अरहानने सांताक्लॉजची टोपी घातली आहे.  मलायकाने तिच्या मुलाला 'सपोर्ट सिस्टम' असे म्हटलं. '#mybabyboy #mybestfriend #mysupportsystem, हे हॅशटग तिने फोटोला दिले. 

नुकताच मलायका हिचा पहिला पती आणि अभिनेता अरबाज याने दुसरं लग्न केलं. अरबाज खान याच्यासोबत घटस्फोट झाल्यानंतर मलायका हिच्या आयुष्यात अभिनेता अर्जुन कपूर याची एन्ट्री झाली. गेल्या अनेक वर्षांपासून मलायका आणि अर्जुन एकत्र आहेत. शिवाय दोघांच्या लग्नाच्या चर्चा देखील सुरु आहे. एका कार्यक्रमात मलायका हिने दुसरं लग्न करणार असल्याची देखील कबुली दिली. 

मलायका अरोराच्या वर्कफ्रंटबद्दल बोलायचे झाले तर, सध्या ती झलक दिखला जा 11 या रिअॅलिटी शोमध्ये जजच्या भूमिकेत दिसत आहे. याशिवाय तिचा 'खो गए हम कहा' या चित्रपटात कॅमिओ असणार आहे.  मलायका अरोरा सध्या ‘सिंगल मदर’ म्हणून मुलगा अरहान याचा सांभाळ करत आहे. 

टॅग्स :मलायका अरोरासेलिब्रिटीबॉलिवूडअर्जुन कपूरअरबाज खान