Join us
Daily Top 2Weekly Top 5

'सरकार, झाली की ६ वर्ष पूर्ण, पण गेल्या वर्षात...'; 'माझ्या नवऱ्याची बायको' फेम सचिन देशपांडेची पोस्ट चर्चेत

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 4, 2024 14:27 IST

Sachin deshpande: सचिन आणि पियुषा यांच्या लग्नाला नुकतीच ६ वर्ष झाली असून अभिनेत्याने त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे.

'माझ्या नवऱ्याची बायको' या मालिकेच्या माध्यमातून घराघरात पोहोचलेला अभिनेता म्हणजे सचिन देशपांडे. या मालिकेत  श्रेयस ही भूमिका साकारुन त्याने बरीच लोकप्रियता मिळवली. सचिनने पियुषा बिद्नुर हिच्यासोबत लग्नगाठ बांधली आहे. सचिन आणि पियुषा यांच्या लग्नाला नुकतीच ६ वर्ष झाली असून अभिनेत्याने त्याच्या पत्नीसाठी खास पोस्ट लिहिली आहे. त्याची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे.

"सरकार, झाली की ६ वर्ष पूर्ण. म्हणजे नवीन term च पण एक वर्ष पूर्ण केलंय आपण, तेही यशस्वीपणे. अशा अनेक term माझं मत कायम तुम्हालाच पडणार आहे ह्याची खात्री बाळगा. पण गेल्या ६ वर्षातलं हे वर्ष सगळ्यात कठीण होतं. एका कलाकाराशी लग्न करताना हा काळ आपल्या आयुष्यात येईल ह्याची तुला कल्पना जरी असली तरी तो काळ प्रत्यक्षात आल्यावर काय करायला हवं ह्याची पूर्वतयारी करता येत नाही. पण तरीही तू मला ह्या काळात जे काही सांभाळून घेतलस त्याला तोड नाही. तुझं निव्वळ असणंच मला इतका Confidence देऊन जातं ना, तू आहेस म्हणून मी तरलोय. अशीच कायम माझ्याबरोबर रहा आणि अशा अनेक पंचवार्षिक योजना आपण एकत्र पूर्ण करत राहू". बाकी हे तुझ्यासाठी खास. अमुक माझं तमुक तुझंजुनं माझं ताज तुझंभूत माझा भविष्य तुझंसाधना माझी यश तुझंआता जे काही आहे माझंते सारं सारं तुझंमाझ्या परमेश्वरातला "प" ही तुझाआणि माझ्या श्रद्धेतलं स्थान ही तुझंच.

दरम्यान, सचिनची ही पोस्ट सध्या सोशल मीडियावर कमालीची व्हायरल होत आहे. सचिनच्या या पोस्टवर सामान्यांपासून सेलिब्रिटींपर्यंत अनेकांनी कमेंट करत त्याला शुभेच्छा दिल्या आहेत. सोबतच त्याच्या लेखाणाचं कौतुकही केलं आहे. सचिन सध्या 'पारु' या मालिकेत काम करत आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनटिव्ही कलाकारमराठी अभिनेता