महेश मांजरेकर हे मराठी आणि हिंदी सिनेसृष्टीतील प्रसिद्ध अभिनेते आणि दिग्दर्शक. महेश यांना आपण विविध सिनेमांमधून अभिनय करताना पाहिलंय. याशिवाय त्यांनी अनेक सुपरहिट सिनेमांच्या दिग्दर्शनाची धुराही सांभाळली आहे. महेश यांची मुलगी सई मांजरेकर सुद्धा बॉलिवूडमध्ये नाव कमावत आहे. अशातच एका मुलाखतीत सईने 'बाबा खिशात लसणाची चटणी ठेवतात', असा खुलासा केलाय. त्यामुळे सर्वांच्या भुवया उंचावल्या आहेत. जाणून घ्यामहेश मांजरेकर खिशात लसणाची चटणी का ठेवतात?
अमर उजालाला दिलेल्या मुलाखतीत महेश मांजरेकर यांची लेक सईने हा खुलासा केला आहे. सईने सांगितलं की, "मी माझ्या वडिलांकडून जी एक गोष्ट शिकली आहे, ती मला नेहमी आठवते. ते जेव्हाही भारताबाहेर जातात, तेव्हा आपल्या खिशात लसणाची चटणी ठेवतात. कारण त्यांना वाटतं की बाहेरचं जेवण बेचव असतं. आणि आता ही सवय मी देखील त्यांच्याकडून घेतली आहे. मी नेहमी माझ्या बॅगमध्ये काहीतरी तिखट ठेवते. कधी मिरची, कधी टॅबॅस्को (Tabasco) किंवा मग एखादी चटणी. कदाचित ही केवळ चव नाही, तर आपलेपणाची एक छोटीशी आठवण आहे. जी मी नेहमी माझ्यासोबत ठेवते."
अशाप्रकारे सईने महेश मांजरेकरांच्या या खास सवयीचा उल्लेख केला. सईने 'दबंग ३' सिनेमात थेट सलमान खानसोबत अभिनय करुन सिनेसृष्टीत पदार्पण केलं. त्यानंतर सईने मेजर, औरो में कहा दम था अशा बिग बजेट बॉलिवूड सिनेमातून सई झळकली. सईच्या करिअरला तिच्या बाबांचा कायमच सपोर्ट राहिला आहे. महेश मांजरेकरांच्या वर्कफ्रंटबद्दल सांगायचं तर त्यांचं दिग्दर्शन असलेला पुन्हा शिवाजीराजे भोसले सिनेमा प्रेक्षकांच्या प्रतिसादात सुरु आहे. परदेशात गेल्यावर महेश मांजरेकरांची ही सवय अनेकांना कामी येईल, यात शंका नाही.
Web Summary : Sai Manjrekar revealed that her father, Mahesh Manjrekar, carries garlic chutney when traveling abroad because he finds foreign food bland. She has adopted this habit, carrying something spicy with her.
Web Summary : साई मांजरेकर ने खुलासा किया कि उनके पिता, महेश मांजरेकर, विदेश यात्रा करते समय लहसुन की चटनी रखते हैं क्योंकि उन्हें विदेशी भोजन बेस्वाद लगता है। उन्होंने भी यह आदत अपना ली है और हमेशा कुछ मसालेदार साथ रखती हैं।