Join us
Daily Top 2Weekly Top 5

"सुटला माझा पदर बाई..." गाण्यावर 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम कलाकारांचा डान्स, व्हिडीओ पाहून पोट धरून हसाल

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 26, 2025 15:33 IST

हास्यजत्रेतील कलाकार ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवताना दिसतात. आता या अवली कलाकारांनी "सुटला माझा पदर, बाई मी नव्हते भानात अन् काळुबाईचं वारं माझ्या भरलं अंगात" या गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' हा टीव्हीवरील लोकप्रिय कार्यक्रम आहे. महाराष्ट्रातील प्रत्येक घराघरात हा कार्यक्रम अगदी आवडीने पाहिला जातो. हास्यजत्रेतील कलाकार अभिनय आणि विनोदाची सांगड घालत प्रेक्षकांना खळखळवून हसवतात. पण, कलाकार ऑनस्क्रीन जेवढी स्किटमध्ये मस्ती करतात तेवढीच ऑफस्क्रीनही त्यांची मजा मस्ती सुरूच असते. रीलमधून आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून ते चाहत्यांचं मनोरंजन करण्याची एकही संधी सोडत नाहीत. 

हास्यजत्रेतील कलाकार ट्रेंडिंग गाण्यावर रील व्हिडिओ बनवताना दिसतात. आता या अवली कलाकारांनी "सुटला माझा पदर, बाई मी नव्हते भानात अन् काळुबाईचं वारं माझ्या भरलं अंगात" या गाण्यावर रील व्हिडीओ बनवला आहे. यामध्ये वनिता खरात, प्रसाद खांडेकर, ओंकार राऊत, नम्रता संभेराव, निखिल बने, अरुण कदम हे कलाकार आधी टॉवेल डोक्यावर घेऊन सोफ्यावर बसल्याचं दिसत आहे. त्यानंतर गाणं सुरू झाल्यावर ते उठून नाचायला लागतात. हास्यजत्रेतील कलाकारांचा हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनाही हसू अनावर झालं आहे. 

'महाराष्ट्राची हास्यजत्रा'ने अनेक नवोदित कलाकारांना संधी देत प्रसिद्धी मिळवून दिली आहे. प्राजक्ता माळी या शोचं सूत्रसंचालन करते. तर सई ताम्हणकर आणि प्रसाद ओक परिक्षक आहेत. गौरव मोरे, निखिल बने, शिवाली परब, ओंकार राऊत हे कलाकार हास्यजत्रेमुळे घराघरात पोहोचले आहेत. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकारनम्रता आवटे संभेराव