Join us

सोन्याची खाण...! 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम शिवाली परबने ट्रेंडिंग गाण्यावर धरला ठेका, व्हिडीओ व्हायरल 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 7, 2025 17:54 IST

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे शिवाली परब हे नाव घराघरात पोहोचलं.

Shivali Parab: 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या कार्यक्रमामुळे शिवाली परब हे नाव घराघरात पोहोचलं. या कार्यक्रमाने तिला नवीन ओळख मिळवून दिली. कल्याणची चुलबुली म्हणून चाहत्यांमध्ये प्रसिद्ध असणारी ही अभिनेत्री सोशल मीडियावर बऱ्याचदा चर्चेत येत असते. नुकताच शिवाली परबने सोशल तिचा एक सुंदर व्हिडीओ शेअर केला आहे. या व्हिडीओमधील अभिनेत्रीचा जबरदस्त डान्स पाहून चाहत्यांनी तिचं कौतुक केलं आहे.

शिवाली परब ही सोशल मीडियावर कमालीची सक्रिय असते. त्यामाध्यमातून आपले फोटो, व्हिडीओ यांच्यासह महत्वाच्या अपडेट्स चाहत्यांना देते. नुकताच इन्स्टाग्रामवर शिवाना सोन्याची खाण... या ट्रेंडिंग गाण्यावर ठेका धरलेल्याचा पाहायला मिळतो आहे. शिवालीने या गाण्यावर जबरदस्त डान्स करत प्रेक्षकांच्या काळजाचा ठोका चुकवला आहे. तसेच नखरेल अदाकारीने तिने चाहत्यांची मनं जिंकली आहेत. 'सोन्याची खाण...', असं कॅप्शन अभिनेत्रीने या व्हिडीओला दिलं आहे. 

दरम्यान, सोशल मीडियावर शिवाली परबचा हा डान्स व्हिडीओ व्हायरल होताच चाहत्यांनी यावर कमेंट्सचा वर्षाव केला आहे. एका चाहत्याने कमेंट करत लिहिलं, खूप छान डान्स. तर दुसऱ्याने लिहिलं, "अति सुंदर...", अभिनेत्रीच्या या व्हिडीओला अनेकांची पसंती मिळताना दिसते आहे.

टॅग्स :टेलिव्हिजनसेलिब्रिटीमहाराष्ट्राची हास्य जत्रा