Join us

Vanita Kharat Wedding Video : वनीने सुमितसाठी घेतला झक्कास उखाणा..., पाहा, वनिता खरातच्या लग्नाचा धम्माल व्हिडीओ

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 3, 2023 13:15 IST

Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat Wedding Video : “…तूच माझा महाराष्ट्र, तूच माझी हास्यजत्रा...”; ऐकून तुम्हीही म्हणाल क्या बात...!!

Maharashtrachi Hasyajatra Fame Vanita Kharat  Wedding Video :  'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम अभिनेत्री वनिता खरात अखेर लग्नबंधनात अडकली. काल २ फेब्रुवारीला वनिताने सुमित लोंढेसोबत लग्नाच्या आणाभाका घेतल्या. या लग्नाचे अनेक फोटो, व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. आता वनिताने लग्नात घेतलेल्या धम्माल उखाण्याचा व्हिडीओही व्हायरल होतोय. वनिता खरातच्या लग्नाची गेल्या काही दिवसांपासून जोरदार चर्चा होती. काल प्रत्यक्षात लग्नसोहळा पार पडला. लग्नात दोघेही लाल आणि पांढऱ्या रंगाच्या पारंपरिक वेशभूषेत फारच सुंदर दिसत आहेत. वनिता आणि सुमितच्या लग्नाला हास्यजत्रेची संपूर्ण टीम उपस्थित होती. अशात धम्माल तर होणारच. मेहंदी, हळदीपासून ते लग्न रिसेप्शनपर्यंत सर्वच कार्यक्रमांत या सर्वांनी धम्माल केली. नवरी बनलेल्या वनिताने धम्माल मस्ती केली. तिच्या उखण्याचा व्हिडीओ पाहून तुम्हालाही त्याची कल्पना येईल.

नवरी बनलेली वनिता सुमितसाठी खास उखाणा घेतला. 'टेन्शन रिलीज करायला शोधले मी फंडे सतरा...सुमित तूच माझा महाराष्ट्र ... तूच माझी हास्यजत्रा', असा तिचा उखाणा ऐकून सगळ्यांनी एकच कल्ला केला. वनिताच्या चेहऱ्यावरचा आनंद यावेळी बघण्यासारखा होता. वनिता खरात 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' या विनोदी कार्यक्रमातून महाराष्ट्राच्या कानाकोपऱ्यात पोहोचली. वनिताचा नवरा सुमित लोंढे हा एक उत्कृष्ट फोटोग्राफर आहे. तसेच तो व्हिडीओ क्रिएटर असण्यासोबत ब्लॉगरदेखील आहे. त्याला फिरण्याची आवड आहे. वनिताने सुमितसोबतचे अनेक फोटोदेखील शेअर केले आहेत. दोघांचेही फोटो चाहत्यांच्या पसंतीस उतरले आहेत.

टॅग्स :वनिता खरातमहाराष्ट्राची हास्य जत्रामराठी अभिनेता