Join us
Daily Top 2Weekly Top 5

"नवा सोबती…" ‘महाराष्ट्राची हास्यजत्रा’ फेम दत्तू मोरेच्या लग्नातील पहिला फोटो आला समोर, फोटो व्हायरल

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 24, 2023 11:37 IST

दत्तू मोरे नुकताच लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नातील पहिला फोटो समोर आला आहे.

'महाराष्ट्राची हास्यजत्रा' कार्यक्रमातून सर्वच कलाकार आज प्रसिद्धीच्या शिखरावर पोहोचले आहेत. प्रेक्षकांना खळखळून हसवणारे हे कलाकार आता स्टार झालेत. त्यांच्या वैयक्तिक आयुष्यात काय चालू असतं याचीही चाहत्यांना उत्सुक असते. तर याच स्टार्सपैकी एक कलाकार म्हणजे दत्तू मोरे (Dattu More) लग्नबंधनात अडकला आहे. त्याच्या लग्नाचे फोटो समोर आले आहेत.

दत्तूने गुपचूप लग्नगाठ बांधली आहे. दत्तूने त्याच्या लग्नाबाबत कुठेही भाष्य केलं नव्हतं. आता त्याच्या लग्नाचे आणि प्रिवेडिंग फोटोशूटचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल झालेत. दत्तूने गुपचूप लग्न करत नव्या आयुष्याला सुरुवात केली. हास्यजत्रेतील इतर कलाकार आणि चाहते दत्तूवर शुभेच्छांचा वर्षाव करत आहेत.  

दत्तून इन्स्टाग्राम अकाऊंटवर लग्नातील फोटो शेअर केले आहेत. यात दत्तूच्या पत्नीने स्वाती निळ्या रंगाची साडी परिधान केलेली आहे. तर दत्तूने धोती-कुर्ता घातलेला दिसतोय. फोटो शेअर करताना, “नवा सोबती, नवी सुरूवात, आशिर्वाद असूद्या”, असे कॅप्शन त्यानं दिलंय. 

दत्तू मोरे त्याच्या हटके डान्स स्टाईलमुळे ओळखला जातो. समोर कितीही दिग्गज असले तरी तो त्याची वेगळी छाप सोडतोच. दत्तू मूळचा ठाण्याचा असून चाळीत लहानाचा मोठा झाला. हास्यजत्रेत लोकप्रिय होताच तो राहत असलेल्या चाळीला 'दत्तू चाळ' असं नाव देण्यात आलं. तो क्षण त्याच्यासाठी नक्कीच खास होता. 

टॅग्स :महाराष्ट्राची हास्य जत्राटिव्ही कलाकार