Join us

"मराठी असल्याचा अभिमान वाटला" प्रियदर्शिनीनं व्हिएतनामधील फोटो शेअर करत म्हटलं...

By ऑनलाइन लोकमत | Updated: August 1, 2025 14:51 IST

प्रियदर्शिनी इंदलकरनं एका खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे.

Priyadarshini Indalkar Vietnam Tour: मराठी कलाविश्वातील लोकप्रिय अभिनेत्री म्हणजे प्रियदर्शिनी इंदलकर. उत्तम अभिनयाच्या जोरावर ती प्रेक्षकांच्या मनावर राज्य करत आहे. प्रियदर्शनीला आपण 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' विविध भूमिका साकारताना पाहिलंय. प्रियदर्शिनीचा आज प्रचंड मोठा चाहतावर्ग आहे. त्यामुळे सोशल मीडियावर तिची कायम चर्चा रंगत असते. अभिनेत्री नेहमी सुंदर फोटो, व्हिडीओ शेअर करत असते. नुकतीच प्रियदर्शिनी इंदलकरनं एका खास पोस्ट सोशल मीडियावर शेअर केली आहे. तिच्या या पोस्टनं अनेकांचे लक्ष वेधले आहे.

प्रिया व्हिएतनामच्या दौऱ्यावर आहे. तिथे प्रियाने मराठी लोककलावंतांच्या 'द फोक आख्यान' या कार्यक्रमाला हजेरी लावली. तिनं पोस्ट शेअर करत लिहलं, "माझी संस्कृती परिधान करून व्हिएतनामी संस्कृती पाहण्यासाठी गेले होते. काय अभिमान वाटला हा टी शर्ट व्हिएतनाममध्ये घालायला. या 'द फोक आख्यान'बद्दल बोलावं तितकं कमी आहे. मुळात त्यावर चर्चा करण्यापेक्षा, ते अनुभवणं जास्त महत्वाचं आहे. खरंच मराठी मातीचा सोहळा आहे. आपल्याच तिजोरीत ठेवलेल्या धनाची जाणीव करुन देणं आहे. ते धन व्यवहारात आणायला हवं. 'अभिजात' म्हणत म्हणत संग्रहालयात जाऊन बसायला वेळ लागणार नाही. 

"हर्ष-विजय यानी अत्यंत सुंदर आणि प्रभावी बांधलेली आणि संगीतबद्ध केलेली गाणी, आपोआप थिरकायला लावणारी वाद्य, त्या २ विशेष रणरागिणी रुचा आणि अनुजा देवरे. हा नवा खेळ सादर करणारा संपूर्ण चमू, आणि जुना थाट आपल्या काळजापर्यंत पोहोचवणारा अत्यंत प्रभावशाली, प्रतिभावान सूत्रधार ईश्वर मानाचा मुजरा तुम्हा सर्वांना! या सर्वांमधून आपल्याला संत भेटतात, मावळे भेटतात, वारकरी भेटतात आणि अनेक लोककलावंत भेटतात. हा थाट आणि हे कलाकार आपल्यापर्यंत पोहोचवायचं सर्वात महत्वाचं आणि अवघड काम रणजित गुगळेा आणि भूषण यांनी केलंय, तुमचे आभार !!! तुम्हा सर्वांवर रंगभूमी अशीच प्रसन्न होत रहावी, हीच प्रार्थना. मराठी लोककलेला इतकी तुडुंब गर्दी आणि इतका तुफान प्रतिसाद पाहुन मन भरून पावलं ! आणि पुन्हा एकदा मराठी असल्याचा अभिमान वाटला! पुन्हा पुन्हा पहावा असा "थाट", अशा शब्दांत प्रियाने भावना व्यक्त केल्या आहेत.

टॅग्स :मराठी अभिनेतासेलिब्रिटीसोशल मीडियामहाराष्ट्राची हास्य जत्रा