मराठी आणि हिंदी सिनेमांमध्ये काम करून मोठा पडदा गाजवणारे नाना पाटेकर आता ओटीटीवरुन प्रेक्षकांचं मनोरंजन करण्यास सज्ज झाले आहेत. सुपरहिट सिनेमांमधून प्रसिद्धी मिळवल्यानंतर आता नाना पाटेकर वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहेत. नाना संकल्प या वेब सीरिजमधून ओटीटीवर पदार्पण करत आहेत. त्यांच्या या वेब सीरिजचा प्रोमो प्रदर्शित करण्यात आला असून नानांच्या या सीरिजमध्ये महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेत्याचीही वर्णी लागली आहे.
या वेब सीरिजमध्ये नाना एका पंडिताच्या भूमिकेत दिसणार आहेत. प्रोमोमध्ये या पंडिताला त्या भागात मोठा आदर-सन्मान असलेला दिसतोय. प्रत्येक मोठा व्यक्ती येऊन पंडिताशी सल्लामसलत करताना दिसतो. अशातच प्रोमोच्या शेवटी नानांचं हिंसक रुप पाहायला मिळतं. अवघ्या काही सेकंदांचा हा प्रोमो जबरदस्त असून नानांचा संयमी तरीही आक्रमक अवतार बघायला मिळतोय. संकल्प या वेब सीरिजचा ट्रेलर महाराष्ट्राची हास्यजत्रा फेम अभिनेता तेजस राऊतने शेअर केला आहे. या सीरिजमध्ये तो महत्त्वाच्या भूमिकेत दिसणार आहे.
तेजसने याआधीही नानांसोबत काम केलं आहे. वनवास या सिनेमात तो दिसला होता. याशिवाय गुलकंद या मराठी चित्रपटातही तो झळकला आहे. सिटी ऑफ ड्रीम्स ३, मेरी या वेब सीरिजमध्ये त्याने काम केलं आहे. चला हवा येऊ द्या, महाराष्ट्राची हास्यजत्रा या शोमधून त्याला प्रसिद्धी मिळाली. तेजस आता संकल्प वेब सीरिजमधून प्रेक्षकांच्या भेटीला येत आहे. MX प्लेअरवर ही वेबसीरिज रिलीज होणार आहे. या सीरिजमध्ये नाना पाटेकरांसह मोहम्मद झिशान अयुब, कुब्रा सैत आणि संजय कपूर हे कलाकार दिसणार आहेत.
Web Summary : Nana Patekar debuts on OTT with 'Sankalp,' where he plays a Pandit. Tejas Raut, known from 'Maharashtrachi Hasyajatra,' also stars in a key role. The series features a powerful trailer and will stream on MX Player.
Web Summary : नाना पाटेकर 'संकल्प' के साथ ओटीटी पर शुरुआत कर रहे हैं, जिसमें वे एक पंडित की भूमिका निभा रहे हैं। 'महाराष्ट्राची हास्यजत्रा' फेम तेजस राऊत भी एक महत्वपूर्ण भूमिका में हैं। यह सीरीज एमएक्स प्लेयर पर स्ट्रीम होगी।