Join us

"कह दो उत्तर वालो से..." माधुरी दीक्षितने थलायवासोबत शेअर केला Photo, कॅप्शन आहे खास

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 19, 2023 15:25 IST

धकधक गर्ल माधुरी आणि थलायवा रजनीकांत यांच्या सेल्फीने वेधलं लक्ष

सध्या सगळीकडे क्रिकेट वर्ल्ड कपचा माहोल आहे. अहमदाबादच्या नरेंद्र मोदी स्टेडियमवर भारत विरुद्ध ऑस्ट्रेलिया सामना रंगत आहे. तर दुसरीकडे या सामन्याचा याचि देही याचि डोळा अनुभव घेण्यासाठी लाखो क्रिकेट रसिक आले आहेत. शिवाय बॉलिवूड कलाकारांचीही कमी नाही. नुकतंच माधुरी दीक्षितने (Madhuri Dixit) दोन दिवसांपूर्वी झालेल्या सेमीफायनलच्या वेळचा एक फोटो शेअर केलाय. हा फोटो साऊथचे थलायवा रजनीकांत (Rajinikanth) यांच्यासोबतचा आहे. माधुरीने सुंदर कॅप्शन देत रजनीकांत यांची स्तुती केली आहे.

'धकधक गर्ल' माधुरी दीक्षित आणि थलायवा रजनीकांत यांनी १९८७ साली आलेल्या 'उत्तर  दक्षिण' सिनेमात एकत्र काम केले होते. नुकतंच दोघांची क्रिकेट सामन्यादरम्यान भेट झाली. यावेळी माधुरीचे पती डॉ नेनेंनी तिघांचा सेल्फी घेतला. फोटोला कॅप्शन देत माधुरीने लिहिले, "कह दो उत्तर वालो से दक्षिण वाले आ गये, हे आमच्या उत्तर दक्षिण या सिनेमातील गाणं होतं. मला आठवतंय सिनेमाच्या शूटिंगवेळी रजनीकांतजी माझ्याशी मराठीतच बोलायचे. जेव्हा जेव्हा आम्ही भेटतो ते सिनेमाच्या आठवणी काढतात. प्रेरणादायी व्यक्तिमत्व आणि अप्रतिम माणूस. त्यांना भेटून आनंद झाला."

माधुरी आणि रजनीकांत आजही अहमदाबादला वर्ल्ड कप फायनलसाठी पोहोचले आहेत. त्याआधी माधुरीने ही पोस्ट केली आहे. चाहतेही रजनीकांत यांची भरभरुन स्तुती करत आहेत. 'उत्तर दक्षिण' हा सिनेमा सुभाष घई यांचा होता ज्यामध्ये माधुरी, रजनीकांत यांच्याशिवाय जॅकी श्रॉफ, अनुपम खेर यांचीही भूमिका होती. 

टॅग्स :माधुरी दिक्षितरजनीकांतसोशल मीडियाबॉलिवूड