Join us

दिल तो पागल है! माधुरी अन् करिष्माचा डान्स Video, चाहत्यांना आली शाहरुखची आठवण

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 31, 2023 16:20 IST

एकेकाळी माधुरी आणि करिश्मा यांच्यात 'कॉंटे की टक्कर'ही होती.

माधुरी दीक्षित (Madhuri Dixit) अन् शाहरुख खानचा (Shahrukh Khan) 'दिल तो पागल है' सिनेमा आठवतोय? सुंदर गाणी, डान्स आणि डायलॉग्सने परिपूर्ण असा हा रोमँटिक चित्रपट आजही तितकाच लोकप्रिय आहे. खरं तर सिनेमात शाहरुख आणि माधुरी दीक्षित असतानाही करिश्मा कपूरने (Karishma Kapoor) तिच्या नृत्याने सर्वांनाच आश्चर्यचकित केलं होतं. हा सिनेमा करिष्मानेच खाऊन टाकला असंही बोललं गेलं. तेव्हा माधुरी आणि करिश्मा यांच्यात 'कॉंटे की टक्कर'ही होती. आता इतक्या वर्षांनी दोन्ही अभिनेत्री एकत्र आल्या आहेत. त्यांचा एक डान्स व्हिडिओ बघून सोशल मीडियावर कमेंट्सचा वर्षाव होतोय.

९० च्या दशकात ज्यांच्या डान्सने चाहत्यांना वेड लावलं त्या OG क्वीन माधुरी दीक्षित आणि करिष्मा कपूर इतक्या वर्षांनी एकत्र आल्या आहेत. 'बलम पिचकारी' या गाण्यावर दोघी डान्स करताना दिसत आहेत. अभिनेत्री करिष्मा कपूरने हा व्हिडिओ शेअर केला आहे. 'डान्स ऑफ एन्व्ही फ्रेंडशिप' असं कॅप्शन तिने दिलं आहे.

 

हा व्हिडिओ पाहून चाहत्यांनी आणि सेलिब्रिटींनी देखील कमेंट्सचा वर्षाव केलाय. अभिनेत्री करिना कपूरने 'OG सुपरस्टार' अशी कमेंट केली आहे. तर कोणी 'दिल तो पागल है' ची आठवण काढत 'बस शाहरुख खानची कमी आहे' अशी कमेंट केली आहे.

टॅग्स :करिश्मा कपूरमाधुरी दिक्षितशाहरुख खानसोशल मीडिया