Join us
Daily Top 2Weekly Top 5

बाबो! कुशल बद्रिकेच्या बायकोने पेटत्या होळीतून काढला जळता नारळ, अभिनेता म्हणतो...

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 14, 2025 08:40 IST

कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन पत्नीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कुशलची पत्नी पेटत्या होळीतून नारळ काढताना दिसत आहे.

देशभरात होळी सर्वत्र मोठ्या उत्साहात साजरी केली जाते. ठिकठिकाणी होळी पेटवून रंगांची धुळवड साजरी केली जाते. सेलिब्रिटीही मोठ्या उत्साहाने होळी साजरी करताना दिसतात. अनेक सेलिब्रिटींनी होळी सेलिब्रेशनचे फोटो आणि व्हिडिओ शेअर करत चाहत्यांना शुभेच्छा दिल्या आहेत. कुशल बद्रिकेनेही त्याच्या कुटुंबीयांसोबत होळीचा सण साजरा केला. 

कुशलने त्याच्या इन्स्टाग्रामवरुन पत्नीचा एक व्हिडिओ शेअर केला आहे. या व्हिडिओत कुशलची पत्नी पेटत्या होळीतून नारळ काढताना दिसत आहे. पत्नीचा हा पराक्रम पाहून कुशल थक्क झाला आहे. कोकणात होळीतून नारळ काढण्याची परंपरा आहे. पत्नीचा हा व्हिडिओ शेअर करत कुशल म्हणतो, "वो स्त्री है वो कुछ भी कर सकती है". अभिनेत्याने शेअर केलेल्या पत्नीच्या या व्हिडिओवर चाहत्यांनी कमेंट्स केल्या आहेत. 

कुशल बद्रिके हा मराठी सिनेसृष्टीतील लोकप्रिय अभिनेता आहे. कुशलने अनेक मालिका आणि सिनेमांमध्येही काम केलं आहे. चला हवा येऊ द्या मुळे कुशलला लोकप्रियता मिळाली. त्याचा चाहता वर्ग मोठा असून अभिनेता सोशल मीडियावरही सक्रिय असल्याचं दिसतं. 

टॅग्स :होळी 2025कुशल बद्रिकेमराठी अभिनेताटिव्ही कलाकार