Join us

'कुमकुम भाग्य'फेम अभिनेत्री होणार आई; लवकरच घेणार मालिकेचा निरोप?

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 2, 2021 15:20 IST

Pooja banerjee:

छोट्या पडद्यावर तुफान गाजलेली मालिका म्हणजे 'कुमकुम भाग्य'(kumkum bhagya). या मालिकेच्या कथानकासोबतच त्यातील कलाकारही तितकेच गाजले. त्यातलंच एक नाव म्हणजे पूजा बॅनर्जी(pooja banerjee). उत्तम अभिनयाच्या जोरावर प्रेक्षकांच्या मनात स्थान निर्माण करणारी पूजा लवकरच आई होणार आहे. ही गोड बातमी तिने एका मुलाखती दरम्यान चाहत्यांसोबत शेअर केली आहे.

अलिकडेच पूजाने एका मुलाखतीत तिच्या होणाऱ्या बाळाविषयी आणि करिअरविषयी चर्चा केली. यावेळी तिने तिच्या प्रेग्नंसीविषयी अनेक खुलासे केले."मी आणि संदिपने २०२० मध्ये फॅमिली प्लॅनिंगचा निर्णय घेता. त्यापूर्वी २०१९ मध्ये झालेल्या एका अपघातानंतर आम्ही हा विचार थांबवला होता. पण, हा आनंददायी क्षण आमच्या आयुष्यात आला आहे", असं पूजा म्हणाली.

पुढे ती म्हणते, "मालिकेचं चित्रीकरण सुरु असताना सेटवरच मला माझ्या प्रेग्नंसीविषयी कळलं. काही दिवसांपासून माझी प्रकृती बरी नव्हती. त्यामुळे मी वैद्यकीय तपासणी केली होती.  दुसऱ्या दिवशी त्या तपासणीचे रिपोर्ट्स आले आणि मी प्रेग्नंट असल्याचं समजलं. त्यावेळी मी संदीपला फोन करुन मला घेण्यासाठी बोलावलं. कारण, मला ही गोष्ट त्याला फोनवर न सांगता समोरासमोर सांगायची होती. ज्यावेळी मी त्याला ही गोष्ट सांगितली. तो आनंदाने नाचायला लागला होता."

दरम्यान, सध्या तरी पूजा या मालिकेतून ब्रेक घेणार नसल्याचं सांगण्यात येत आहे.  परंतु,  येत्या काही महिन्यांनंतर ती या शोमधून बाहेर पडणार असल्याचं म्हटलं जात आहे.

टॅग्स :पूजा बॅनर्जीटिव्ही कलाकारटेलिव्हिजन