Join us
Daily Top 2Weekly Top 5

'कुछ कुछ होता है' ची तुफान क्रेझ, पुन्हा रिलीज होतोय सिनेमा, काही मिनिटातच 'हाऊसफुल'

By ऑनलाइन लोकमत | Updated: October 12, 2023 14:20 IST

या सिनेमाला रिलीज होऊन तब्बल २५ वर्ष झाली आहेत.

प्रसिद्ध दिग्दर्शक करण जोहरचा(Karan Johar)  पहिलाच सिनेमा 'कुछ कुछ होता है' (Kuchh Kuchh Hota Hain) पाहिला नाही असं कोणीच नसेल. ९० च्या दशकात या सिनेमाने तरुणांना प्रेमाचं वेड लावलं. आजही तरुणांना हा सिनेमा खूप जवळचा वाटतो. या सिनेमाला रिलीज होऊन तब्बल २५ वर्ष झाली आहेत. यानिमित्ताने हा सिनेमा पुन्हा थिएटरमध्ये रिलीज करण्यात येणार आहे.

धर्मा प्रोडक्शनकडून 'कुछ कुछ होता है' रि-रीलीज आणि स्पेशल स्क्रीनिंगची घोषणा करण्यात आली. मेकर्सने सांगितले की, 15 ऑक्टोबरला शाहरुख खान, काजोल आणि राणी मुखर्जीचा 'कुछ कुछ होता है पुन्हा एकदा थिएटरमध्ये पाहण्याची संधी मिळत आहे. विशेष म्हणजे काही मिनिटातच सिनेमाचे तिकीट्स बुक झाले. शो हाऊसफुल झाला. यातूनच या सिनेमाची क्रेझ किती आहे हे सिद्ध झालं. 

सिनेमाच्या तिकीट दराबाबत बोलायचं तर पॉपकॉर्नही खरेदी करता येणार नाही इतक्या स्वस्त तिकीटाचा दर आहे. २५ वर्ष पूर्ण झाल्यानिमित्ताने याचे तिकीट दरही केवळ २५ रुपये ठेवण्यात आले आहे. १५ ऑक्टोबरला मुंबईतील वर्सोवा येथे पीव्हीआर आयकॉन थिएटरमध्ये संध्याकाळी ७ आणि 7.15 असे दोन  शो दाखवण्यात येणार आहे. काही मिनिटांतच दोन्ही शोचे तिकीट विकले गेले आहेत. 

टॅग्स :करण जोहरबॉलिवूडशाहरुख खानकाजोलराणी मुखर्जी