Join us
Daily Top 2Weekly Top 5

"बरीच मुलं वारसा घेतात पण याने.."; लक्ष्याचा लेक अभिनयसाठी प्रसिद्ध दिग्दर्शकाची खास पोस्ट 

By ऑनलाइन लोकमत | Updated: May 6, 2024 13:22 IST

लक्ष्मीकांत बेर्डेंचा लेक अभिनय बेर्डेसाठी प्रसिद्ध मराठी दिग्दर्शकाने लिहिलेली खास पोस्ट चर्चेत आहे (laxmikant berde, abhinay berde)

प्रसिद्ध अभिनेते लक्ष्मीकांत बेर्डेंचा मुलगा अभिनय बेर्डे हा मराठी मनोरंजन विश्वातील सर्वांचा लाडका अभिनेता. अभिनयने आजवर विविध सिनेमांमधून प्रेक्षकांच्या मनावर राज्य केलं. 'ती सध्या काय करते' सिनेमातून अभिनय प्रसिद्धीच्या झोतात आला. काहीच दिवसांपुर्वी अभिनयची भूमिका असलेला 'बॉईज 4' सिनेमा गाजला. आता अभिनय 'आज्जीबाई जोरात' या नाटकातून प्रेक्षकांच्या भेटीला आलाय. त्यानिमित्ताने नाटकाचा लेखक-दिग्दर्शक क्षितीज पटवर्धनने लक्ष्मीकांत बेर्डेंचं नाव घेत अभिनय साठी खास पोस्ट लिहिली आहे.

अभिनयचा ब्लॅक अँड व्हाईट फोटो पोस्ट करत क्षितीज लिहितो, "मागे लक्ष्मीकांत बेर्डे सरांचा फोटो पाहिला आणि पुढे उभा अभिनय, फोटो काढताना असं वाटलं की बरीच मुलं वारसा घेतात, याने वसा घेतलाय. तू जिथे कुठे जाशील तिथे त्यांचा आशीर्वाद असाच तुझ्या पाठीशी असेल! अतिशय गुणी, मेहनती, समजूतदार, आणि उत्स्फूर्त अभिनेता. आज्जीबाई जोरात पाहून प्रेक्षक आपल्याच मुलाचं कौतुक करावं तसं अभिनयचं कौतुक करतात. ही त्याची कमाई आणि त्याच्या आईवडलांची पुण्याई."

अभिनय बेर्डेची प्रमुख भूमिका असलेलं 'आज्जीबाई जोरात' हे नाटक रंगभूमीवर हाऊसफुल्ल प्रतिसादात सुरु आहे. क्षितीच पटवर्धनने या नाटकाच्या लेखन - दिग्दर्शनाची जबाबदारी सांभाळली आहे. 'पहिलं AI महाबालनाट्य', अशी टॅगलाईन देऊन या नाटकाची जाहिरात करण्यात आलीय. या नाटकात अभिनयशिवाय निर्मिती सावंत, पुष्कर श्रोत्री आणि मुग्धा गोडबोले यांची प्रमुख भूमिका आहे.

 

टॅग्स :अभिनय बेर्डेलक्ष्मीकांत बेर्डेमराठीमराठी अभिनेतानाटक