कोकण हार्टेड गर्ल (kokan hearted girl) अर्थात अंकिता वालावलकर ही सोशल मीडियावर चांगलीच सक्रीय असते. अंकिताला आपण बिग बॉस मराठी ५ मध्ये पाहिलं होतं. अंकिताने टॉप ५ पर्यंत मजल मारली होती. बिग बॉसमध्ये असताना अंकिताने (ankita prabhu walawalkar) तिच्या बॉयफ्रेंडचा खुलासा केला होता. त्यानंतर बिग बॉसमधून बाहेर आल्यावर अंकिताने तिचा बॉयफ्रेंड कुणाल भगतसोबत लग्न केलं. अंकिताने लग्नानंतर तिच्या कुलदैवतेचं दर्शन घेतलं. त्यानिमित्त अंकिताने शेअर केलेली पोस्ट चर्चेत आहे.
अंकिताच्या पोस्टची चर्चा
अंकिताने कुणालसोबतचे फोटो पोस्ट करुन लिहिलं की, "आज आम्ही आमच्या कुलदैवतेचं (लक्ष्मीनारायण मंदिर,वालावल) दर्शन घेतलं.लग्न पण इथेच ह्याच जागी झाल.माझ्या मनातली लग्नाची भीती आणि म्हणून केलेलं कुलदैवतेच्या मंदिरात लग्न ….पण तु सगळी भीती घालवलीस.आज नवरा बायको म्हणुन इथे निवांत बसताना आठवणी पण ताज्या झाल्या…. लग्नापासूनच शुन्यातून विश्व उभ करतोय आपण…आज आशीर्वाद घेऊन नवीन पाऊल टाकतोय खात्री देते नेहमी सोबत असेन….इथे आलो की लग्नाच्या आठवणीत रमायला होईल पण प्रत्येक चांगल्या गोष्टीची सुरुवात इथूनच झाली ह्याचा आनंद असेल."
अशाप्रकारे अंकिताने पोस्ट लिहिली आहे. कोकण हार्टेड गर्ल नावाने प्रसिद्ध असलेली सोशल मीडिया स्टार अंकिता प्रभू वालावलकरने १६ फेब्रुवारी २०२५ रोजी लग्न केलं. अंकिताचा बॉयफ्रेंड कुणाल हा सुप्रसिद्ध संगीतकार आहे. अंकिता आणि कुणाल लग्नानंतरही सोशल मीडियावर त्यांच्या वैयक्तिक आयुष्याबद्दलचे अपडेट्स शेअर करत असतात. अंकिता बिग बॉसनंतर तिच्या विविध व्यवसायांमध्ये लक्ष देत आहे.