Join us

'कोकण हार्टेड गर्ल' अंकिता वालावलकर पोहचली 'शिवतीर्था'वर, राज ठाकरेंना दिलं लग्नाचं निमंत्रण

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 2, 2025 12:38 IST

अंकिता आणि कुणालनं राज ठाकरेंना लग्नाचं निमंत्रण दिलं आहे.

'कोकण हार्टेड गर्ल' म्हणून ओळखली जाणारी 'बिग बॉस' (Bigg Boss Marathi Season 5 ) फेम अंकिता वालावलकर (Ankita Prabhu Walawalkar) हिची सध्या लगीनघाई सुरु आहे. लवकरच ती मराठी मनोरंजन विश्वातील संगीतकार कुणाल भगत याच्याशी लग्न करणार आहे.  अंकिता आणि कुणालची लगीनघाई सुरू झाली आहे. लग्नाचं आमंत्रण देण्यासाठी अंकिता आणि कुणाल हे मनसे अध्यक्ष राज ठाकरे (Raj Thackeray) यांच्या भेटीला 'शिवतीर्थ'वर पोहचले.

अंकिता आणि कुणालनं राज ठाकरेंना लग्नाचं निमंत्रण दिलं आहे. दोघांनीही इन्स्टाग्रामवर राज ठाकरे यांच्यासोबतचा फोटो शेअर केलाय. यामध्ये राज ठाकरेंसह त्यांच्या पत्नी शर्मिला ठाकरे देखील पाहायला मिळत आहे. विशेष म्हणजे कुणाल आणि अंकितानं सर्वात आधी लग्नाची बातमीदेखील राज ठाकरेंनाच सांगितली होती. गेल्या वर्षी कुणाल हा राज ठाकरे यांच्या 'येक नंबर' या चित्रपटासाठी काम करत होता. तेव्हाचं दोघांनी गुढीपाडव्यालाच राज ठाकरेंना लग्नाबद्दल सांगितलं होतं.अंकिता होणारा पती कुणाल भगत दोघांनी राज ठाकरे यांचं व्यक्तीमत्व आवडतं. 

अंकिताची लग्न पत्रिका ही खास केळीच्या पानाच्या डिझाइनची आहे. कुणाल आणि अंकिता यांची देवनागरीमध्ये नावं लिहिली आहेत.  पत्रिकेला  खास कोकणी टच आहे. अंकिताने परंपरेनुसार सर्वप्रथम गावच्या मंदिरात आपल्या लग्नाची पत्रिका ठेवली होती. अंकितानं अद्याप लग्नाची तारीख जाहीर केलेली नाही. पण माहितीनुसार, अंकिता फेब्रुवारी किंवा मार्च महिन्यात बोहल्यावर चढणार असल्याचं बोललं जात आहे. हे जोडपं लग्नबंधनात केव्हा अडकणार याची तिचे चाहते आतुरतेने वाट पाहत आहेत. 

टॅग्स :अंकिता प्रभू वालावलकरराज ठाकरेलग्नमराठी अभिनेता