Join us
Daily Top 2Weekly Top 5

या वीकेंडला OTT वर बघायला मिळेल सिनेमा अन् वेबसीरिजची मेजवानी! वाचा संपूर्ण यादी

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 22, 2024 13:03 IST

या आठवड्यात काय पाहायचंय? याचा विचार करत असल्यास बातमीवर क्लिक करुन वाचा संपूर्ण यादी

प्रत्येक शनिवार-रविवारी सुट्टी असल्यावर वीकेंडला काय करायचं हा प्रश्न अनेकांना पडत असतो. काहीजण कुठेतरी फिरायला जातात. तर काही खेळायला जातात. दर्दी सिनेमावेडी माणसं मात्र वीकेंडला घरबसल्या सिनेमा किंवा वेबसीरिज पाहायला प्राधान्य देतात. याच दर्दी सिनेप्रेमींना या वीकेंडसाठी बरेच ऑप्शन आहेत. कारण गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असलेले लोकप्रिय सिनेमे अन् वेबसीरिज येत्या आठवड्यात रिलीज होत आहेत. वाचा संपूर्ण यादी.

1. 'ये काली काली आँखे' सीजन २२०२२ साली 'ये काली काली आँखे' ही वेबसीरिज झाली होती. रहस्यमयी कथानकामुळे या वेबसीरिजला लोकांची चांगली पसंती मिळाली. त्यावेळी लॉकडाऊन असल्याने वेबसीरिज माऊथ पब्लिसिटीच्या जोरावर जास्त पाहिली गेली. याच वेबसीरिजचा पुढचा सीझन अर्थात 'ये काली काली आँखे 2' नेटफ्लिक्सवर आज शुक्रवारी रिलीज होतोय. ताहिर राज भासीन, श्वेता त्रिपाठी, आँचल सिंग या कलाकारांची प्रमुख भूमिका आहे.

2. किष्किंधा कांडम

आसिफ अली, अपर्णा बालमुरली आणि विजयराघवन यांची प्रमुख भूमिका असलेला 'किष्किंधा कांडम' हा सिनेमा सध्या चर्चेत आहे. Disney+Hotstar वर हा सिनेमा रिलीज झालाय. जंगलातील एका घरातून पिस्तुल हरवते आणि मग पुढे रहस्याचा उलगडा कसा होतो याची कहाणी किष्किंधा कांडम सिनेमातून बघायला मिळते. १९ नोव्हेंबरपासून हा सिनेमा Disney+Hotstar या ओटीटीवर तुम्ही घरबसल्या पाहू शकता.

3. बघिरा

श्रीमुरली यांचा कन्नड सिनेमा 'बघीरा' हा थिएटरमध्ये चांगलाच गाजला. हा सिनेमा आता नेटफ्लिक्सवर रिलीज झालाय. सिनेमा सध्या तरी तेलगूमध्ये उपलब्ध असून तामिळ, मल्याळम आणि हिंदी वर्जनसाठी प्रेक्षकांना काही काळ वाट बघावी लागणार आहे. सिनेमात एका पोलीस अधिकाऱ्याची थरारक कहाणी आहे ज्याला सुपरहिरो बनायची इच्छा असते. सकाळी पोलिसांची ड्यूटी करुन रात्री हा ऑफिसर वेगळा मास्क लावून गुंडांचा सफाया करताना दिसतो.

4. ड्यून: प्रोफेसी

अनेकांना माहित नसेल पण हॉलिवूडचा गाजलेला सिनेमा ड्यूनचा प्रीक्वल रिलीज झालाय. ड्यून प्रोफेसी असं या सीरिजचं नाव असून यामध्ये बॉलिवूड अभिनेत्री तब्बूची खास भूमिका आहे. जिओ सिनेमावर तुम्हाला ही सीरिज पाहता येईल. १७ नोव्हेंबरला या सीरिजचा पहिला भाग रिलीज झालाय. तर दुसरा भाग २४ नोव्हेंबरला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे. अशाप्रकारे या आठवड्यात प्रेक्षकांना बॉलिवूड, साऊथ अन् हॉलिवूड कलाकृतींची मेजवानी आहे. आता यापैकी कोणता सिनेमा पाहायचाय हा निर्णय तुमचा.

टॅग्स :वेबसीरिजबॉलिवूडTollywood