Join us
Daily Top 2Weekly Top 5

किरण खेर यांनी खरेदी केली 'इतकी' महागडी कार, किंमत एकूण बसेल धक्का

By ऑनलाइन लोकमत | Updated: March 15, 2024 14:44 IST

जगभरात अशा अनेक महागड्या गाड्या आहेत ज्यांची किंमत करोडोंच्या घरात आहे.

बॉलिवूड अभिनेत्री किरण खेर तिच्या दमदार अभिनयासाठी ओळखली जाते. त्या चित्रपटांपासून दूर असल्या तरी त्याच्या फॅन फॉलोइंगमध्ये कोणतीही कमतरता झालेली नाही. चंदीगडच्या खासदार किरण खेर यांनी नुकतीच नवीकोरी कार खरेदी केली आहे. या कारचा एक व्हिडीओ सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. दरम्यान ही कार खरेदी केल्यानंतर फॅन्स त्याला शुभेच्छा देतायत.

किरण खेर या काळ्या रंगाच्या पोषाखात कारच्या बाजूला उभ्या असल्याचं समोर आलेल्या व्हिडीओमध्ये दिसून येत आहे. किरण यांनी तब्बल 1.65 कोटी रुपयांची नवी कार खरेदी केली आहे. ही काही  सामान्य कार नसून जीएलएस मर्सिडीज आहे. ही एक लक्झरी कार आहे. ही भारतात विकली जाणारी सर्वांत महागडी  कार आहे. किरण यांच्या  या आलिशान कारचा व्हिडीओ सध्या सोशल मीडियावर व्हायरल होत आहे. 

किरण खेर या चंदीगडच्या खासदार आहेत. राजकारणात आल्यापासून किरण चित्रपटांमध्ये कमी सक्रिय झाल्या आहेत. किरण खेर यांना काही वर्षांपूर्वी कर्करोगाशी लढा द्यावा लागला होता. यानंतर त्यांची तब्येत खूपच कमकुवत झाली होती.  किरण खेर सोशल मीडियावर खूप सक्रिय असतात. त्याचे पती अनुपम खेर देखील किरण यांच्याशी संबंधित अपडेट्स शेअर करत असतात. किरण खेर यांनी अनेक बॉलिवूड सिनेमांमध्ये काम केले आहे. 'देवदास','रंग दे बसंती','हम तुम','मै हु ना' सारख्या सिनेमांमध्ये भूमिका केल्या आहेत. 

टॅग्स :किरण खेरसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमाकारअनुपम खेर