Join us
Daily Top 2Weekly Top 5

खुशी कपूरने शेअर केला फोटो, 'तो' मिस्ट्री मॅन कोण? नेटकऱ्यांनी लावले भलतेच अंदाज

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 31, 2025 16:46 IST

खुशी कपूरने सेल्फी फोटो शेअर केला आहे. यात ती एका मिस्ट्री मॅनच्या मिठीत आहे.

दिवंगत अभिनेत्री श्रीदेवी यांची धाकटी लेक खुशी कपूरचा (Khushi Kapoor) दुसरा हिंदी सिनेमा प्रदर्शित होत आहे. खुशी 'लव्हयापा' सिनेमात झळकणार आहे. आमिर खानचा मुलगा जुनैद खानसोबत तिने स्क्रीन शेअर केली आहे. सिनेमाचा ट्रेलर सगळ्यांनाच आवडला आहे. शिवाय गाणीही उत्तम आहेत. व्हॅलेंटाईन वीकला ७ फेब्रुवारी रोजी सिनेमा प्रदर्शित होणार आहे. नुकतंच खुशीने इन्स्टाग्रामवर एक फोटो शेअर केला आहे ज्यामध्ये ती मिस्ट्री मॅनला मिठी मारते. तो मिस्ट्री मॅन कोण याचा अंदाज सगळे लावत आहेत.

खुशी कपूरने सेल्फी फोटो शेअर केला आहे. यात ती एका मिस्ट्री मॅनच्या मिठीत आहे. त्याने हुडी घातली असून त्याचा पाठमोरा फोटो आहे. त्यामुळे फक्त खुशीचाच चेहरा दिसत आहे. यामध्ये खुशी तर खूपच आनंदाच दिसत आहे. या फोटोसोबत तिने कॅप्शनमध्ये लिहिले, 'तो ग्रिडपर्यंत तर पोहोचला आहे, आता आम्ही तुमच्या हदयापर्यंत लवकरच पोहोचू' असं कॅप्शन तिने लिहिलं आहे. यावरुन हा मिस्ट्री मॅन कोण असा अंदाज सगळे लावत आहेत.

खुशी खऱ्या आयुष्यात वेदांग रैनला डेट करत आहे. वेदांग आणि खुशी दोघांनी 'द आर्चीज' सिनेमातून हिंदी सिनेसृष्टीत पदार्पण केलं होतं. तेव्हापासून दोघं रिलेशनशिपमध्ये आहेत. आता खुशीने वेदांगसोबतचाच हा फोटो शेअर केला आहे असं अनेकांचं म्हणणं आहे तर काहींनी नवीन सिनेमाची घोषणा तर नाही ना असाही अंदाज बांधला आहे. काही नेटकऱ्यांना तर हा सैफचा मुलगा इब्राहिम अली खानच वाटत आहे. आता खुशी कडूनच यामागचं नेमकं सत्य कळेल असं दिसतंय.

टॅग्स :खुशी कपूरबॉलिवूडव्हायरल फोटोज्सोशल मीडिया