बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ बॉलिवूडमधील सर्वात सुंदर अभिनेत्रींपैकी एक आहे. त्यातील एक कारण हेदेखील आहे की कतरिना तिच्या स्टाइल स्टेटमेंटमुळे नेहमी चर्चेत राहते. तिचा फॅशन सेन्स तिच्या चाहत्यांना खूप भावतो. तसेच तिला कलर कॉम्बिनेशनचा देखील चांगले समजते. ती वेस्टर्न आऊटफिटमध्ये जितकी ग्लॅमरस दिसते तितकीच ती साडीतही दिसते. एकदा कतरिना साडीवरील क्लासिक ब्लाउजमुळे एका रात्रीत खूप चर्चेत आली होती.
खरेतर कतरिना सर्वात जास्त त्यावेळी चर्चेत आली होती ज्यावेळी २०१८ साली शाहरूख खान आणि गौरी खानने दिवाळी पार्टीचे आयोजन केले होते. यावेळी कतरिनाने मेटेलिक टोन्स आणि ग्लॉसी फॅब्रिक्सवाला ड्रेससोडून सिंपल मोनोक्रोमैटिक लूकची निवड केली होती. ज्यात ती सिंपलसोबत खूप ग्लॅमरस दिसत होती. तिने फॅशन डिझायनर सब्यासाचीने डिझाइन केलेली ब्लॅक साडी घातली होती. ज्यात शीर, शिफॉन आणि जॉर्जेटसारखे मिक्स्ड फॅब्रिकचा वापर केला होता.
कतरिनाची ही साडी एम्ब्रोडरी फ्री होती. या साडीवरील ब्लाउजवर विशेष काम केले होते. कतरिनाचा ब्लाउज शीर फॅब्रिकचा होता. त्याला बोल्ड लूक देत प्लजिंक नेकलाइनमध्ये डिझाइन केला होता.
ब्लाउज फुल स्लीव्जचा होता. तिच्या साडीने विशेष करून ब्लाउजमुळे सर्वांच्या नजरा तिच्याकडे खिळल्या होत्या. तिचा या लूकमधील फोटो सोशल मीडियावर व्हायरल होतो आहे.