Katrina Kaif In Karnataka:कतरिना कैफ (Katrina Kaif) ही बॉलिवूडच्या सर्वात लोकप्रिय अभिनेत्रींपैकी एक आहे. एकापेक्षा एक चित्रपट तिनं बॉलिवूडला दिले आहेत. पण, आता व्यवसायिक कामामुळे नाही तर तिच्या वैयक्तीक आयुष्यामुळे कतरिना कैफ चर्चेत आली आहे. तिनं सर्वांचं लक्ष वेधून घेतलं आहे. कतरिना धार्मिक होताना दिसून येतेय. अलिकडेच तिने सासूसोबत शिर्डीतील साई बाबा मंदिराला भेट देत दर्शन घेतलं होतं. त्यानंतर ती प्रयागराजमधील महाकुंभातही पोहचली होती. आता कतरिना ही कर्नाटकातील कुक्के सुब्रमण्य मंदिरात भक्तीत तल्लिन झाल्याचं पाहायला मिळालं.
कर्नाटकातील कुक्के सुब्रमण्य मंदिर हे भगवान सुब्रमण्य यांना समर्पित एक पवित्र स्थान आहे. हे मंदिर 'सर्प संस्कार'साठी प्रसिद्ध आहे. याठिकाणी सापाच्या शापापासून मुक्तता मिळते. कतरिना कैफ देखील सर्प संस्कार पूजेमध्ये सहभागी होताना दिसली. ही पूजा सहसा पूर्वजांनी साप किंवा नागदेवतेला मारल्याबद्दल प्रायश्चित्त म्हणून केली जाते. ही पूजा २ टप्प्यात केली जाते आणि सुमारे चार ते पाच तास चालते. मंगळवार आणि बुधवारी दररोज चार ते पाच तास या खास पूजेमध्ये कतरिना सहभागी झाली. ती मंदिराच्या व्हीआयपी गेस्ट हाऊसमध्ये वास्तव्याला होती. दुपारी मंदिरात झालेल्या विधीला उपस्थित राहिल्यानंतर, जेव्हा कतरिना मंदिराच्या आवारातून बाहेर पडली तेव्हा तिने आपली ओळख लपवण्यासाठी ओढणीने चेहरा झाकला होता.
'सर्प संस्कार' पूजा काय आहे?सर्प दोष, कालसर्प दोष आणि नाग दोषापासून मुक्ती मिळविण्यासाठी हा विधी केला जातो. असे मानले जाते की जर एखाद्या व्यक्तीच्या पूर्वजांनी अजाणतेपणे किंवा जाणूनबुजून नाग देवतेला मारले असेल किंवा नुकसान केले असेल तर त्याच्या प्रभावापासून मुक्त होण्यासाठी हा विशेष विधी केला जातो. असे केल्याने मालमत्ता, आरोग्य आणि करिअरशी संबंधित अडथळे देखील दूर होतात. याशिवाय, हे विधी केल्याने पूर्वजांच्या आत्म्यांनाही शांती मिळते आणि त्यांचे आशीर्वाद मिळतात. ज्यामुळे आयुष्यात आनंद आणि समृद्धी येते. यापूर्वी, जेव्हा विकी कौशल 'छावा' च्या प्रमोशनमध्ये व्यस्त होता,