Join us
Daily Top 2Weekly Top 5

भारतीयांनी ज्या देशाला 'बॉयकॉट' केलं, त्याचीच ग्लोबल ब्रँड अँबेसिडर बनली कतरिना कैफ

By ऑनलाइन लोकमत | Updated: June 10, 2025 16:26 IST

पंतप्रधान मोदींच्या दौऱ्याआधी कतरिनाची नियुक्ती

कतरिना कैफ (Katrina Kaif) बॉलिवूडमधली सर्वात लोकप्रिय अभिनेत्री आहे. तिची लोकप्रियता पाहता मालदीव (Maldives) देशाने तिची ग्लोबल ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली आहे. आज मालदीव मार्केटिंग अँड पब्लिक रिलेशन्स कॉर्पोरेशनने ही घोषणा केली. विशेष म्हणजे पंतप्रधान नरेंद्र मोदींच्या मालदीव दौऱ्याआधी ही घोषणा झाली आहे. 

काही महिन्यांपूर्वी नरेंद्र मोदींविरोधात मालदीवच्या तीन युवा मंत्र्यांनी नकारात्मक टिप्पणी केली होती. तेव्हा संपूर्ण देशवासियांनी 'बॉयकॉट मालदीव'ची मोहीम राबवली होती. अनेकांनी मालदीवचे बुकिंग्स रद्द केले होते. तसंच मोदींनी लक्षद्वीपचं पर्यटन वाढावं म्हणून सर्वांना प्रोत्साहन दिलं होतं. आता आज मालदीव जनसंपर्क अधिकाऱ्यांनी कतरिना कैफची 'सनी साइड ऑफ लाइफ'साठी ग्लोबल ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती केली. ही पार्टनरशिप visit Maldives या स्पेशल समर सेल कँपेनच्या अंतर्गत करण्यात आली आहे. यासह मालदीव जगभरातील पर्यटकांना आकर्षित करण्याच्या प्रयत्नात आहे. तसंच मालदीवची ही घोषणा पंतप्रधान मोदींच्या मालदीव दौऱ्याच्या आधी केली गेली आहे.

कतरिना कैफ प्रसिद्ध अभिनेत्री आणि व्यावसायिकही आहे. मालदीव ग्लोबल ब्रँड अँबेसिडर म्हणून नियुक्ती झाल्यावर ती म्हणाली, "मालदीव लक्झरी आणि नैसर्गिक सौंदर्याचा अद्भूत संगम आहे. इथे भव्यता आणि शांतता दोन्ही आहे. सनी साइड ऑफ लाईफ चा चेहरा होणं माझ्यासाठी सम्मानाची बाब आहे. या माध्यमातून मी जगभरातील नागरिकांना मालदीवची ओळख घडवून आणण्यासाठी आतुर आहे."

टॅग्स :कतरिना कैफबॉलिवूडमालदीव