दिग्दर्शिक, निर्माता करण जोहर (Karan Johar) आणि अभिनेता कार्तिक आर्यन (Kartik Aryan) यांच्या नवीन सिनेमाची घोषणा नुकतीच झाली आहे. यासोबत करण आणि कार्तिकमधला वादही मिटला असल्याचं दिसत आहे. 'दोस्ताना २' सिनेमातून कार्तिकचा पत्ता कट केल्यानंतर त्यांच्यात वाद असल्याचं समोर आलं होतं. करण जोहरकार्तिक आर्यनला सिनेमात कास्ट करत नसल्याची चर्चा होती.
करण जोहर निर्मित कार्तिक आर्यनचा आगामी सिनेमा 'तू मेरी मै तेरा, मै तेरा तू मेरी' सिनेमाची घोषणा केली. याची झलक दाखवणारा एक व्हिडिओ त्याने शेअर केला आहे. यासोबत त्याने लिहिले, "तुम्हारा रे आ रहा है रुमी, मम्मी की खाई हुई कसम, ये मम्मा बॉय पूरी करके रहता है."
कार्तिकचा हा सिनेमा रोमँटिक कॉमेडी आहे. यामध्ये अभिनेत्री नक्की कोण असणार हे रिव्हील करण्यात आलेले नाही. 'सत्यप्रेम की कथा'चे दिग्दर्शक समीर विध्वंस या सिनेमाचं दिग्दर्शन करणार आहेत. त्यामुळे चाहते फारच आतुर आहेत. तसंच सिनेमाचं टायटलही खूपच मोठं असल्याने याचीही चर्चा आहे. २०२६ मध्ये सिनेमा रिलीज होणार आहे.