Join us

'या' एका गोष्टीचा Kartik Aaryan ला होतोय पश्चाताप?; करिअरविषयी केला खुलासा

By ऑनलाइन लोकमत | Updated: December 5, 2021 13:45 IST

Kartik aarya: कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या कार्तिकने यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. अलिकडेच कार्तिकने एका मुलाखतीत त्याच्या करिअरविषयी भाष्य केलं.

स्वबळावर कलाविश्वात हक्काचं स्थान निर्माण करणारा अभिनेता म्हणजे कार्तिक आर्यन (kartik aaryan). उत्तम अभिनयशैली आणि साधेपणा यामुळे कार्तिक अल्पावधीत लोकप्रिय अभिनेत्यांच्या यादीत जाऊन पोहोचला. कलाविश्वात पदार्पण करणाऱ्या कार्तिकने यश आणि अपयश या दोन्ही गोष्टी अनुभवल्या आहेत. अलिकडेच कार्तिकने एका मुलाखतीत त्याच्या करिअरविषयी भाष्य केलं. यावेळी त्याने कोणता चित्रपट केल्यामुळे त्याला आयुष्यभर पश्चाताप करावा लागला हे सांगितलं.

"करिअरचा आलेख चढत असताना कोणता चित्रपट केल्यामुळे तुझ्यावर पश्चातापाची वेळ आली?" असा प्रश्न कार्तिकला एका मुलाखतीत विचारण्यात आला. मात्र, कार्तिकने अत्यंत हुशारीने या प्रश्नाचं उत्तर दिलं.

"खरं पाहता मला कोणताच चित्रपट केल्यामुळे पश्चाताप होत नाहीये.  मला आयुष्यात तितका आत्मविश्वास नक्कीच आहे. माझे निर्णय कामय मी ठामपणे घेतले आहेत. त्यामुळे माझ्यावर कोणीही कोणता निर्णय थोपवला. जर माझ्याकडून कोणती चूक झाली तरीदेखील तो निर्णय हा सर्वस्वी माझाच असेल. आणि, जर निर्णय योग्य निघाला तरीदेखील तो निर्णयसुद्धा माझाच असेल", असं कार्तिक म्हणाला.

दरम्यान, अलिकडेच कार्तिकचा 'धमाका' हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आला. नेटफ्लिक्सवर प्रदर्शित झालेल्या या चित्रपटात त्याच्यासोबत अभिनेत्री मृणाल ठाकूरने स्क्रीन शेअर केली आहे.

टॅग्स :कार्तिक आर्यनसेलिब्रिटीबॉलिवूडसिनेमामृणाल ठाकूर