Join us

जया बच्चन यांनी अभिषेकसोबत लग्नासाठी करिष्मा कपूरसमोर ठेवली होती ही अट; मग मोडला साखरपुडा

By ऑनलाइन लोकमत | Updated: January 12, 2023 17:48 IST

जया बच्चन यांची अट करिश्माची आई बबिता यांना मान्य नव्हती. मग करिश्माने साखरपुडा मोडला. यानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबात प्रचंड मोठा वाद झाल्याचंही बोललं जातं.

Karisma Kapoor Marriage: अभिषेक बच्चन (Abhishek Bachchan) आणि ऐश्वर्याचे लग्न व्हायच्याआधी अभिनेत्री करिश्मा कपूर (Karisma Kapoor) सोबत त्याचा साखरपुडा झाला होता. पण काही कारणास्तव त्यांचे लग्न होऊ शकले नाही. अभिषेक आणि करिश्माचा साखरपुडा मोडल्यावर त्याच्या फॅन्सना चांगलाच धक्का बसला होता. करिश्मा आणि अभिषेकने 'हा... मैंने भी प्यार किया' या चित्रपटात एकत्र काम केले होते. करिश्मा आणि अभिषेकचा साखरपुडा मोडल्यानंतर त्या दोघांनी कधीच एकत्र काम केले नाही. अभिषेक आणि करिश्मा यांच्या आयुष्यात घडलेल्या या गोष्टीला आता अनेक वर्षं झाले आहेत. ते दोघे आपआपल्या आयुष्यात स्थिरावले देखील आहेत.

बिग बी अमिताभ यांनी त्यांच्या 60 व्या वाढदिवशी अभिषेक-करिश्माच्या साखरपुड्याची घोषणा केली होती. त्यावेळी सर्वांना अभिषेक-करिश्माच्या प्रेमाविषयी समजले.दोघांचा साखरपुडाही झाला मात्र या नात्याला कुणाची तरी नजर लागली. अभिषेकसोबत लग्नानंतर करिश्माने सिनेमात काम करु नये, अशी जया बच्चन यांनी तिला अट घातल्याचे बोललं जातं. ही अट करिश्माची आई बबिता यांना मात्र मान्य नव्हती. कारण त्याकाळी अभिषेकचे अनेक सिनेमे फ्लॉप होत होते.

तर करिश्मा आघाडीची अभिनेत्री होती. अभिषेक कधी यशस्वी झालाच नाही तर अशी भिती बबिता यांना होती.शिवाय त्यांना अभिषेक पसंतच नव्हता. त्यामुळेच करिश्माने आईची भीती लक्षात घेत ठरलेला साखरपुडा मोडला. यानंतर कपूर आणि बच्चन कुटुंबात प्रचंड मोठा वाद झाल्याचंही बोललं जातं.  करिश्माशी लग्न मोडल्यानंतर अभिषेकचं विश्वसुंदरी आणि अभिनेत्री ऐश्वर्या रायसह लग्न झालं. दोघांचा सुखी संसार सुरु आहे. दुसरीकडे करिश्माचे संजय कपूरशी झालेले लग्न फार काळ टिकले नाही.

टॅग्स :करिश्मा कपूरअभिषेक बच्चनजया बच्चन