Join us

४७ वेळा शूट झाला करिश्मा आणि आमिरचा 'तो' किसिंग सीन, अभिनेत्री थरथर कापत होती कारण...

By ऑनलाइन लोकमत | Updated: November 17, 2024 16:41 IST

सिनेमातील आमिर-करिश्माच्या एका किसिंग सीनचीही प्रचंड चर्चा रंगली होती. पण, हा किसिंग सीन शूट करण्यासाठी करिश्माने तब्बल ४७ टेक घेतले होते. 

'राजा हिंदुस्थानी' हा ९०च्या दशकातील गाजलेल्या सिनेमांपैकी एक. आमिर खान आणि करिश्मा कपूर मुख्य भूमिकेत असलेला हा सिनेमा १९९६ मध्ये प्रदर्शित झाला होता. या सिनेमातील गाणी प्रचंड हिट झाली होती. तर आमिर-करिश्माची जोडीही प्रेक्षकांना भावली होती. या सिनेमातील आमिर-करिश्माच्या एका किसिंग सीनचीही प्रचंड चर्चा रंगली होती. पण, हा किसिंग सीन शूट करण्यासाठी करिश्माने तब्बल ४७ टेक घेतले होते. 

आमिर आणि करिश्माची ऑनस्क्रीन केमिस्ट्री चाहत्यांना आवडली होती. या सिनेमात किसिंग सीन करताना मात्र करिश्माची धांदल उडाली होती. हा किसिंग सीन शूट करताना करिश्मा थरथर कापत होती. सिनेमातील हा किसिंग सीन उटीमध्ये शूट झाला आहे. फेब्रुवारी महिन्यात भर थंडीत आमिर आणि करिश्माचा हा रोमँटिक सीन शूट झाला होता. त्यामुळेच करिश्मा थरथरत होती. थंडीमुळे हा सीन तब्बल ४७वेळा शूट करावा लागला होता. 

'राजा हिंदुस्थानी' सिनेमाने बॉक्स ऑफिसवर बंपर कमाई केली होती. ६ कोटींचं बजेट असलेल्या सिनेमाने तब्बल ७८ कोटींचा गल्ला जमवला होता. आमिर आणि करिश्माचा हा सिनेमा ब्लॉकबस्टर ठरला होता. या सिनेमासाठी करिश्माला सर्वोत्कृष्ट अभिनेत्रीचा फिल्मफेअर पुरस्कार मिळाला होता. 

टॅग्स :आमिर खानकरिश्मा कपूरसेलिब्रिटीसिनेमा