Join us

“ते एकमेकांना भेटले आणि...”, Mr. and Mrs. Malhotraसाठी करण जोहरची भावुक पोस्ट

By ऑनलाइन लोकमत | Updated: February 8, 2023 10:27 IST

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : सिद्धार्थ मल्होत्रा व कियारा अडवाणी या सुंदर जोडप्यासाठी करण जोहरने (Karan Johar) खास पोस्ट लिहिली आहे. करणची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. 

Sidharth Malhotra Kiara Advani Wedding : सिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणी हे बॉलिवूडचं क्यूट कपल काल लग्नबंधनात अडकलं. राजस्थानच्या जैसलमेर येथील सूर्यगढ पॅलेसमध्ये दोघांनीही लग्नाच्या आणाभाका घेतल्या. सिद्धार्थ व कियाराने लग्नाचे काही सुंदर फोटोही शेअर केले आहेत. वधूवराच्या  पोशाखात दोघंही कमालीचे सुंदर दिसत होते. यावेळी सिद्धार्थ गोल्डन एम्ब्रॉयडरीसह ऑफ-व्हाइट शेरवानीमध्ये दिसला, तर कियाराने गुलाबी रंगाचा लेहेंगा परिधान केला होता.

आता आमचं परमनंट बुकिंग झालं आहे. तुमच्या सर्वांच्या प्रेमाची आणि आशीर्वादाची आम्हाला गरज आहे, असं कॅप्शन देत दोघांनीही लग्नाचे खास फोटो शेअर केलेत. आता या सुंदर जोडप्यासाठी करण जोहरने (Karan Johar) खास पोस्ट लिहिली आहे. करणची ही पोस्ट सध्या तुफान व्हायरल होतेय. 

करणने लिहिले...

“मी त्याला (सिद्धार्थला) दीड दशकांपूर्वी भेटलो होतो…. शांत, कणखर आणि संवेदनशील…मग मी तिला (कियारा) खूप वर्षांनी भेटलो… शांत, कणखर आणि तितकीच संवेदनशील… मग ते एकमेकांना भेटले आणि मला त्या क्षणी कळलं की, हे दोघं एक चांगला बाँड निर्माण करू शकतात आणि एकत्र जादुई लव्ह स्टोरी तयार करू शकतात…त्यांना एकत्र पाहणं एखाद्या परिकथेसारखं होतं. आज प्रेमाच्या मंडपात त्यांनी आणाभाका घेतल्या. तेव्हा प्रत्येकाला एक वेगळीच उर्जा जाणवली. मी अभिमानाने, आनंदाने, त्यांच्याबद्दल प्रेम व्यक्त करत बसलो. सिड-कियारा मी तुम्हा दोघांवर खूप प्रेम करतो, तुमचं संपूर्ण आयुष्य आजच्याच दिवसासारखं असो,” असं प्रेमळ व काहीशी भावुक पोस्ट करणने लिहिली. सोबत सिद्धार्थ व कियाराचा एक सुंदर फोटोही पोस्ट केला. 

करण जोहर सिद्धार्थ व कियाराच्या लग्नाला हजर होता. सिद्धार्थने करण जोहरच्याच सिनेमातून डेब्यू केला होता. स्टुडंट ऑफ द इयर या चित्रपटातून सिद्धार्थच्या करिअरची सुरूवात झाली होती. कियारानेही करणसोबत काम केलं आहे. कियारा व करण दोघांचं सुद्धा खास बॉन्डिंग आहे.  

टॅग्स :करण जोहरसिद्धार्थ मल्होत्राकियारा अडवाणीबॉलिवूड