Join us

'दोस्ताना 2' मधून टेलिव्हिजनवरील 'या' लोकप्रिय चेहऱ्याची सिल्वर स्क्रिनवर होणार धमाकेदार एन्ट्री!

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 5, 2019 12:49 IST

अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम आणि प्रियंका चोप्रा स्टारर दोस्ताना सिनेमाचा सीक्वल लवकरच तयार करण्यात येणार आहे.

अभिषेक बच्चन, जॉन अब्राहम आणि प्रियंका चोप्रा स्टारर दोस्ताना सिनेमाचा सीक्वल लवकरच तयार करण्यात येणार आहे. दोस्ताना 2 साठी कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूरला कास्ट करण्यात आले आहे. आता या सिनेमातील तिसऱ्या अभिनेत्याचा शोध देखील पूर्ण झाला आहे. करण जोहर यासिनेमातून एक नवा चेहरा बॉलिवूडमध्ये लॉन्च करतो आहे. 

  करण जोहरने इन्स्टाग्रामवर फोटो शेअऱ करत लिहिले आहे की, एक नव्या चेहरा लॉन्च करताना धर्मा प्रोडक्शनला आनंद आणि एक्सायडेट आहे. लक्ष्य आमच्या दोस्ताना 2 मधून बॉलिवूडमध्ये डेब्यू करतोय. आम्हाला आशा आहे की आमच्यासोबत तो एक सॉलिड जर्नी सुरु करेल. लक्ष्यचे स्वागत करा आणि त्याला तुमचं प्रेम आणि आर्शिवाद द्या. लक्ष्य याआधी टिव्ही शोजमध्ये दिसला होता. लक्ष्य हा टिव्ही जगातला ओळखीचा चेहरा आहे. रोडिज X2चा तो स्पर्धक आहे. याशिवाय अधुरी कहानी हमारी, प्यार तुने क्या किया, परदेस में है मेरा दिल आणि पोरस सारख्या अनेक मालिकांमध्ये त्याने काम केले आहे. पोरसमधील त्याची भूमिका प्रेक्षकांना आवडली देखील होती.  

  'दोस्ताना 2' मध्ये याआधी या भूमिकेसाठी राजकुमार राव आणि सिद्धांत चतुर्वेदीच्या नावाचा विचार सुरु होता. मात्र आता मेकर्सनी लक्ष्यचे नाव या भूमिकेसाठी फायनल केले आहे. पहिल्यांदा कार्तिक आर्यन आणि जान्हवी कपूर एकत्र स्क्रिन शेअर करताना दिसणार आहेत. 

टॅग्स :करण जोहरपोरस