गेल्या अनेक महिन्यांपासून बॉलिवूडमध्ये रणवीर सिंग आणि दीपिका पादुकोणच्या लग्नाची जोरदार चर्चा आहे. बी-टाऊनचे हॉट कपल नोव्हेबरमध्ये लग्नाच्या बंधनात अडकणार आहे. याआधी कबीर बेदीने ट्वीट करून याची माहिती दिली होती. आता करण जोहरनेदेखील यावर कमेंट केली आहे.
रिपोर्टनुसार करण जोहरला रणवीर-दीपिकाच्या लग्नाबाबत प्रश्न विचारण्यात आला. यावर त्याला हा किंवा नाही असे दोनच ऑप्शन्स देण्यात आले. यावर करणने उत्तर दिले की रणवीर आणि दीपिकाने लग्नाच्या चर्चा त्यांनी कधीच नाकारल्या नाहीत.
दिल्लीमध्ये झालेल्या इव्हेंटमध्ये दीपिकाला याबाबत प्रश्न विचारण्यात आला होता तेव्हा तिचा पारा चांगलाच चढला होता आणि यावर बोलण्यास तिने स्पष्ट शब्दात नकार दिला होता. दीपिकाला आपल्या लग्नाची तारीख सुरक्षित ठेवायची आहे ज्यामुळे ती नवे काही प्रोजेक्ट साईन करत नाहीय.
रिपोर्टनुसार दोघांचे लग्न याचवर्षी 20 नोव्हेंबरला इटलीमध्ये होऊ शकते. लग्नासाठी या कपलने इटलीच्या लेक कोमो, लोम्बार्डी नावाचे ठिकाण सिलेक्ट केले आहे. बीच हॉलिडेसाठी याला बेस्ट डेस्टिनेशन म्हटले जाते. लेक कोमो हे इटली येथील तिसरा सर्वात मोठा तलाव आहे. हा तलाव 1300 फूट खोल आणि 146 स्क्वेअर किलोमीटर लांब आहे.रिपोर्टनुसार, दोघांचे लग्न दाक्षिणात्य पद्धतीने होणार आहे. पहिले दोघांच्या लग्नाची तारीख 10 नोब्हेंबर ठरवण्यात आली होती. यानंतर 20 नोव्हेंबर ही तारीख ठरवण्यात आली. दीपिका सध्या कोणताही नवा प्रोजक्ट हातात घेत नाही आहे. दीपिका आणि रणवीर गेल्या पाच वर्षांपासून एकमेकांना डेट करत आहेत. दोघांनी कधीच पब्लिकली आपले रिलेशन स्वीकारले नाही.